शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:37 IST

शेतीच्या वहिवाटीवरून मयत महिला, तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे आत्या आणि तिच्या मुलीने फिर्यादीला सांगितले होते

सोलापूर - शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या वृद्ध आईची मुलगा, सून व व्याहीने मिळून संगनमताने हत्या केल्याची धक्कादायक घटना ३० मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली आहे. माढा तालुक्यातील मुंगशी येथील हा प्रकार आहे. इथं लक्ष्मी महाडिक असं खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मारूती रेवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा दत्तात्रय महाडिक, सून रजनी महाडिक, व्याही धर्मराज बागल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मयत वृद्ध महिला फिर्यादीची आत्या असून तिला गावात ८ एकर शेतजमीन आहे. फिर्यादीच्या मयत आत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी कल्पना ढेरे विवाहित असून सध्या ती ऑस्ट्रिया देशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. मयताच्या पतीचेही १० महिन्यापूर्वी निधन झाले आहे. आरोपी मुलगा आणि सून हे दोघे पक्क्या घरात राहतात तर मयत महिलेचे सुनेशी पटत नसल्या कारणाने घराशेजारीच एका पत्र्याच्या शेडमध्ये ती राहत होती. 

शेतीच्या वहिवाटीवरून मयत महिला, तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे आत्या आणि तिच्या मुलीने फिर्यादीला सांगितले होते. सहा महिन्यांपूर्वी आरोपी मुलगा, सून आणि तिचे वडील शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून ऊसाच्या सरीत महिलेला मारहाण केली होती. फिर्यादीला ऑस्ट्रियात राहणाऱ्या मयत महिलेच्या मुलीचा व्हॉट्सअप कॉल आला होता. तिने सांगितले की, माझ्या आईला शेतामध्ये मारून टाकले आहे. तू जाऊन बघ, मग फिर्यादी अनाळा येथून मुंगशी येथे आत्या लक्ष्मी यांच्या घरी रात्री ११ वाजता आला. मयताच्या घराजवळ लोक जमले होते. उसाच्या शेतामध्ये जाऊन पाहिले असता सरीमध्ये लक्ष्मी रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडली होती. 

दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या महिलेच्या डोक्यातून रक्त येत होते. तिचा गळा कपड्याने आवळलेला होता. तोंडावर, डोक्यात दगडाने मारून तिला जिवे मारले होते असं फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.  सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी