शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

... म्हणून दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना बजावली नोटीस 

By पूनम अपराज | Published: January 28, 2021 2:27 PM

Farmers Tractor Rally : हे सर्व शेतकरी नेते कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या संघटनांनी माघार घेतली आहे. 

ठळक मुद्देका कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीबाबत पोलिसांसोबत झालेल्या कराराचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर का कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना दिल्लीपोलिसांनी नोटीस बजावली आहे. काल पूर्व दिल्ली पोलीस ठाण्यात राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनीशेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांचेही नाव आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदरसिंग, बलबीरसिंग राजेवाल, बूटासिंग बुर्जगिल, जोगिंदरसिंग उग्राहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व शेतकरी नेते कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या संघटनांनी माघार घेतली आहे. 

दिल्ली पोलिसांनी हा एफआयआर नोंदविली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश टिकैतसह ६ शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चानेही यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. संयुक्त किसान मोर्चातर्फे शेतकरी व मजुरांविरूद्ध हा मोठा कट असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी म्हणतात, आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. ज्या लोकांनी हिंसाचार केला आहे, ते लोक आमच्याबरोबरचे लोक नाहीत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 200 लोकांना ताब्यात घेतले. लवकरच आणखी लोकांना अटक केली जाईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीFarmerशेतकरी