नवी दिल्ली - राजधानी एक्स्प्रेमध्ये एका विद्यार्थिनीसोबत आईस्क्रीममध्ये गुंगीचं औषध देऊन छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली - रांची राजधानी एक्स्प्रेसमधील तिकीट तपासणीस आणि पॅन्ट्री कर्मचाऱ्याकडून विनयभंग करण्यात आला आहे. रेल्वेने याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. दरम्यान, टीसीला निलंबित करण्यात आलं असून वेटरला कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.पीडित विद्यार्थिनी असून तिच्या ओळखीतील एका महिलेने ट्विट करत या घटनेची माहिती दिली. पीडित विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जर कायदेशीर कारवाई करायला गेलो तर आपण गुंतत अशी भीती तिला वाटत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्र्यांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग केलं होतं. पीडित विद्यार्थिनीने याप्रकरणी पोलीस तक्रार केल्याची माहिती या महिलेने दिली आहे. महिलेच्या ट्विटची दखल घेत रेल्वेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागत यासंबंधी योग्य ते पाऊल उचलत कारवाई प्रक्रिया सुरु आहे. योग्य ती कारवाई केली जाईल असा प्रतिसाद दिला.
धक्कादायक! राजधानी एक्स्प्रेसमध्ये आईस्क्रीममध्ये गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 21:55 IST
टीसीला निलंबित करण्यात आलं असून वेटरला कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.
धक्कादायक! राजधानी एक्स्प्रेसमध्ये आईस्क्रीममध्ये गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीचा विनयभंग
ठळक मुद्देटीसीला निलंबित करण्यात आलं असून वेटरला कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.योग्य ती कारवाई केली जाईल असा प्रतिसाद दिला. पीडित विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे.