Shocking! Rape on minor niece by threatening to viral objectionable video of aunt | धक्कादायक! मावशीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भाचीवर केला बलात्कार

धक्कादायक! मावशीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भाचीवर केला बलात्कार

ठळक मुद्देजोगेश्वरी परिसरात एका कौटुंबिक सोहळ्यात पीडित मुलीच्या मावशीसोबत त्याची भेट झाली. या प्रकरणी आशीष दुबे ऊर्फ अजलम लष्कर(२६) याला खार परिसरातून अटक करण्यात आली आहे.मावशीचा मोबाइल क्रमांक त्याने मिळवला आणि त्यामार्फत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू केले.

मुंबई : मावशीचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन भाचीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत उघडकीस आला. या प्रकरणी आशीष दुबे ऊर्फ अजलम लष्कर (२६) याला खार परिसरातून अटक करण्यात आली आहे.

जोगेश्वरी परिसरात एका कौटुंबिक सोहळ्यात पीडित मुलीच्या मावशीसोबत त्याची भेट झाली. या दोघींनाही स्वत:ची आशीष दुबे अशी ओळख करून देत तो एका खासगी कंपनीत काम करत असल्याचे त्याने सांगितले. मावशीचा मोबाइल क्रमांक त्याने मिळवला आणि त्यामार्फत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू केले. ही मैत्री प्रेमात बदलली आणि त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. या अवस्थेत त्याने एक व्हिडीओ क्लिप तयार केली होती. त्यानंतर त्याची भेट सोळा वर्षांच्या पीडित मुलीसोबत झाली. तेव्हा त्याने तिला एकटे गाठत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिच्या मावशीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. त्यामुळे तिने या कोणालाही काहीच सांगितले नाही. मात्र एक दिवस तिची तब्येत बिघडली. त्यामुळे घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले. तेव्हा ती गरोदर असल्याचे समजले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या पालकांनी याची माहिती बांगुरनगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अजमलवर बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Shocking! Rape on minor niece by threatening to viral objectionable video of aunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.