धक्कादायक! ७ मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून वृद्धेचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 06:27 PM2021-07-13T18:27:30+5:302021-07-13T18:30:28+5:30

An old man fell from the terrace : बोरिवली संक्रमण शिबिर येथील प्रकार

Shocking! An old man fell from the terrace of a 7-storey building and died | धक्कादायक! ७ मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून वृद्धेचा मृत्यू 

धक्कादायक! ७ मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून वृद्धेचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधीक चौकशी सुरू आहे.खासगी कंपनीत अंकुश नोकरी करतो. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आणि सिंह हे दोघेच याठिकाणी राहत होते. त्याची आई मानसिक रुग्ण होती आणि जिच्यावर उपचार सुरू होते.

मुंबई: सात मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून माया जयशंकर सिंह (६१) या महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे हा प्रकार बोरिवलीच्या संक्रमण शिबीर इमारतीत घडला. त्या मानसिक रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरू होते असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानुसार याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधीक चौकशी सुरू आहे.

सिंह या मुलगा अंकुश (३१) याच्या सोबत संक्रमण शिबिरात गुलमोहर या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत होत्या. मंगळवारी सकाळी त्या इमारत परिसरात जखमी अवस्थेत स्थानिकाना दिसल्या. त्यानुसार त्यांनी याबाबत पोलिसांना व अंकुशला कळविले. कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना कांदिवलीच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. जीथे डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केले. खासगी कंपनीत अंकुश नोकरी करतो. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आणि सिंह हे दोघेच याठिकाणी राहत होते. त्याची आई मानसिक रुग्ण होती आणि जिच्यावर उपचार सुरू होते.

महिनाभरापूर्वी सिंह यांना शिव रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र अचानक घरातून त्या निघून जायच्या आणि परत यायच्या. 'मंगळवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे घराबाहेर कोणीच नव्हते. परिणामी त्या पडल्याचे कोणी पाहिले नाही. तसेच संक्रमण शिबिर असल्याने आसपास सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. मात्र सिंह यांची वैद्यकीय कागदपत्रे पडताळून पाहण्यात आली असून अद्याप तरी यात काही संशयीत बाब आढळलेली नाही, त्यानुसार याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे', अशी माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

Web Title: Shocking! An old man fell from the terrace of a 7-storey building and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.