शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दारुची दुकाने बंद झाली म्हणून व्यथित तळीरामाने आत्महत्याच केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 16:42 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व दारूची दुकानं बंद असल्याने तो दारू मिळत नसल्याने निराश होता.

ठळक मुद्देमृत व्यक्तीचे नाव कुलंगर वित्तील सनोज असं आहे.केरळमध्ये आज सकाळी केचेरीनजीक असलेल्या थुव्वानूर येथे झाडाला लटकलेली ३८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला.

थ्रिस्सूर - लॉकडाऊनदरम्यान दारूची दुकानं बंद असल्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना असावी. केरळमध्ये आज सकाळी केचेरीनजीक असलेल्या थुव्वानूर येथे झाडाला लटकलेली ३८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे नाव कुलंगर वित्तील सनोज असं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीस दारूचे व्यसन होते, त्याला दररोज दारू लागत असे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व दारूची दुकानं बंद असल्याने तो दारू मिळत नसल्याने निराश होता.

तर मृतांचा भाऊ प्रदीप यांनी सांगितले की, सनोज अनेक कारणांमुळे व्यधित होता. त्याचे वडील चांगान हे अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आहेत. तसेच आई जानकी ही देखील आजारी असते. त्याने आयुष्यात काही न केल्याची त्याला खंत होती. त्यातच त्याचे लग्न देखील झाले नव्हते. त्याला चांगली नोकरी देखील नव्हती. त्यातच देशातील लॉकडाऊनमुळे उत्तम नोकऱ्यांच्या संधी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने तो तणावाखाली होता. या सर्व तणावामुळे सनोज दारू पित होता. मात्र, जेव्हा मद्याच्या प्रवाहात वाहत गेला, तेव्हा सत्याचा सामना करणे असह्य झाले असेल आणि त्यामुळे त्याने आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला असावा असे प्रदीप यांनी पुढे सांगितले. कुण्णामकुलम एसीपी टी. एस. सनोज यांनी सांगितले की, अद्याप मृत व्यक्तीच्या घरातून सुसाईट नोट सापडली नसून पुढील तपास सुरु आहे. तसेच केरळ सरकारने व्यसनाधीन माणसाची अशी परिस्थिती झाल्यास त्यांना डी - ऍडिक्शन सेंटरमध्ये दाखल करण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळPoliceपोलिस