शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सेक्सटॉर्शन! सोशल मिडियावरुन मधाळ जाळयात ओढून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 8:14 PM

Sextortion Case : २५० जणांच्या अश्लील व्हिडीओची विक्री, ५ जणांवर कारवाई

ठळक मुद्देया मंडळीनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

मुंबई : सोशल मीडियावरुन ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे व्हॉट्सअप क्रमांक शेअर होताच तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ कॉल आला. अश्लील संवाद रंगला. आणि तरुणीच्या मधाळ जाळयात तोही विवस्त्र झाला. पुढे याच व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या मंडळीनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात देशभरातील उच्चभ्रू तसेच उच्च शिक्षित मंडळी त्यांच्या जाळयात अडकली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या मंडळीच्या तक्रारी वाढत होत्या. या मंडळीनी फसवणूकिसाठी मुलींच्या नावे ट्वीटरची ५, इंस्टाग्रामची ४ आणि फेसबुकवर ३ असे एकूण १२ फेक अकाउंट उघडले होते. 

आता पर्यंत या टोळीने राज्यभरात २५० जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना नाममात्र किंमतीत विक्री केल्याचे दिसून आले. याची विक्री करताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी टेलिग्रामचा वापर केला. याप्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि ओडिशातील ५ जणांवर कारवाई केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून अधिक तपास सुरु आहे. आरोपीकड़ून ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.

नेपाळ कनेक्शन...

 आरोपींनी सेक्सटॉर्शनद्वारे मिळणारी रक्कम 

स्विकारण्यासाठी उघडलेल्या बँक अकाउंटसाठी बनावट  कागदपत्रांचा वापर केला. तसेच आर्थिक व्यवहारासाठी भारताव्यतिरिक्त नेपाळमधील बँक खात्याचाही वापर करण्यात आला आहे. 

अनोळखी व्हिडिओ कॉल घेऊ नका

Whats Appवर येणारे अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका अथवा त्यावर कुठलाही प्रतिसाद देऊ नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसMumbaiमुंबईWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप