शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

खळबळजनक! नरेंद्र मेहतांकडून माझ्या जीवास धोका; भाजपाच्याच नगरसेविकेने केले गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 8:18 PM

भाजपाचे माजी आमदार मेहतांच्या विरोधात भाजपा नगरसेविकेची तक्रार

ठळक मुद्देमेहतांकडून गेल्या काही वर्षांपासून अत्याचार होतअसून मला व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सोन्स यांनी म्हटले आहे.सोमवारी सायंकाळी मेहता यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट टाकून आपण भाजपा तसेच राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचे सर्वेसर्वा व माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना तक्रार केली आहे. मेहतांकडून गेल्या काही वर्षांपासून अत्याचार होतअसून मला व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सोन्स यांनी म्हटले आहे. या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे.मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी एकीकडे भाजपा व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस असताना सोमवारी सायंकाळी मेहता यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट टाकून आपण भाजपा तसेच राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. माझ्या कृती, पध्दती वा माझ्या आचरणामुळे भाजपाचे नुकसान होत आहे. माझ्यामुळे पक्षाच्या नेत्यांना लाज वाटेल, मानखाली घालावी लागेल असे काही मी सहन करु शकत नाही असे मेहतांनी सांगितल्याने त्यांना देखील पुढच्या घटनाक्रमाचा अंदाज आला असल्याची शक्यता आहे.

लोकमतने देखील निवडणुकीवरुन सोमवारी सायंकाळी झालेला वाद आणि सोन्स यांनी भाजपा नेत्यास दिलेली क्लीप या नंतर तासाभराच्या आतच मेहतांनी फेसबुकवर पोस्ट टाकून व नंतर व्हिडिओ टाकून आपण भाजपा व राजकारण सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, भाजपा नगरसेवकांना गोव्यावरुन आणून वरसावे येथील मेहतांच्या सीएन रॉक हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी भाजपा आणि राजकारण सोडल्याचे सांगणारे मेहता आज मंगळवारी मात्र सीएन रॉक हॉटेलमध्ये भाजपा नगरसेवकांसह माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत उपस्थित होते. भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, आम्ही नगरसेवकांनी आणि चव्हाणांनी पक्ष सोडू नका, तुमची गरज आहे असा आग्रह मेहतांकडे धरला होता. मेहतांनी महापौर, उपमहापौर सह स्थायी समिती सभापती भाजपाचा निवडून आणायचाच असे आवाहन केल्याचे ते म्हणाले.दरम्यान, मेहतांचे दोन व्हिडिओ काही संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. तर दुसरीकडे भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी त्यांच्या फेसबुकवर व्हिडओ पोस्ट करुन आपण पोलीस महानिरीक्षक तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असून नरेंद्र मेहतांकडून मला, मुलाला व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. हे आजचे नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून चालले असून या आधी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती.मेहता हे भाजपाच्या आड अनैतिक व गैर प्रकार करत असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना आपण कळवले होते. मेहतांच्या अनैतिक कामांना उघड करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले होते व ते पक्षश्रेष्ठींना दिले होते. जनतेने नाकारलेल्या मेहतांना त्यांच्या या अनैतिक व गैरकामांमुळे पक्षाने पण नाकारावे अशी भूमिका होती. माझी मेहताशी लढाई ही माझ्या मान व जीवा साठी आहे. माझ्या व मुलाच्या हक्काची लढाई आहे. यातुन प्रत्येक महिला जीचे शोषण झाले तीला पण ताकद मिळेल असे सोन्स यांनी म्हटले आहे. या लढाईत सर्वांची साथ हवी आहे असे आवाहन नीला यांनी केले आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसmira roadमीरा रोड