शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खळबळजनक! तरुणीवर सामूहिक बलात्कार करून अ‍ॅसिडने जाळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 10:12 PM

कातारनिया घाट जंगलात तरुणीचा मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील बहराइच येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून  तिचा मृतदेह अ‍ॅसिडने जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या तरुणीचा चेहरा अ‍ॅसिडमुळे पूर्णपणे जळालेला होता. तरुणीची ओळख लपविण्यासाठी तिचा चेहरा जाळण्यात आला.

नवी दिल्ली - हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा मृतदेह जाळल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर देखील देशात कुठे ना कुठे अशा घटना घडत आहेतच. उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारची एक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून  तिचा मृतदेह अ‍ॅसिडने जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कातारनिया घाट जंगलात तरुणीचा मृतदेह सापडला आहे.उत्तरप्रदेशात एका तरुणीचा मृतदेह स्थानिकांना जळालेल्या अवस्थेत आढळला. उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील मुर्तिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृतक तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार या मुलीचे वय २० वर्षे असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतक मुलीचा चेहरा अ‍ॅसिडने जाळल्याचे दिसून येत आहे.अज्ञात आरोपींनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली असावी आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून जंगलात टाकून दिला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या तरुणीचा चेहरा अ‍ॅसिडमुळे पूर्णपणे जळालेला होता. तरुणीची ओळख लपविण्यासाठी तिचा चेहरा जाळण्यात आला. तर शरीरावरही अनेक ठिकाणी जळलेल्याच्या जखमा आहेत. 

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. पोलीस उप अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली हे तपास पथक तपास करणार आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. 

 

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनPoliceपोलिस