सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 06:47 PM2020-08-12T18:47:39+5:302020-08-12T18:51:46+5:30

दीड महिन्याहून अधिक काळ बेपत्ता राहून बुधवारी पणजी उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांना शरण आला.

SantaCruz gang war case, gangster Zenito Cardoz surrenders to police | सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

googlenewsNext
ठळक मुद्देजेनिटो हा सांताक्रूझ येथील टोळी युद्धातील मास्टरमाईंड असल्याचा जुने गोवा पोलिसांचा दावा आहे.पोलिसांना गुंगारा देत इतका काळ जेनिटो कुठे होता हेही त्यांनी आता पोलिसांना सांगितले.

पणजी: सांताक्रूज येथील टोळीयुद्ध प्रकरणात पोलिसांना हवा असलेला गँगस्टर जेनिटो कार्दोज बुधवारी पोलीसाां शरण आला. दीड महिन्याहून अधिक काळ बेपत्ता राहून बुधवारी पणजी उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांना शरण आला.


जेनिटो हा सांताक्रूझ येथील टोळी युद्धातील मास्टरमाईंड असल्याचा जुने गोवापोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची कोठडीतील चौकशी करण्यात आल्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी जेनिटोच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. या टोळी युद्धात एकाचा खूनही झाला होता. परंतु गुन्हा नोंद होताच जेनिटो अटक चुकविण्यासाठी बेपत्ता झाला होता.  दीड महिन्यापेक्षा अधिक काळ आटापिटा करूनही त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. शरण आलेल्या जेनिटोला जुने गोवा पोलिसांनी अटक केली असून रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात अले आहे.

 


पोलिसांना गुंगारा देत इतका काळ जेनिटो कुठे होता हेही त्यांनी आता पोलिसांना सांगितले. तो महाराष्ट्रात पळाला होता. महाराष्ट्रातही त्याचे काही मित्र आहेत. त्यातील काही गुन्हेगारी पार्श्वभुमीचेही मित्र आहेत. त्यापैकी काहींना जुने गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु त्यांच्याकडून जेनिटोचा पत्ता काढून घेण्यास पोलिसांना यश आले नव्हते. अलिकडेच सावंतवाडीच्या एका युवकालाही पोलीस घेऊन आले होते. दीड दिवस चौकशीनंतर त्याला सोडुन देण्यात आले होते.

अपहरण प्रकरणातही वॉन्टेड
जेनिटो हा सांताक्रूझ टोळी युद्ध प्रकरणात जसा जुने गोवा पोलिसांना हवा आहे तसाच तो पणजी पोलिसांनाही वेगळ््या गुन्हा प्रकरणासाठी हवा आहे. करंजाळे येथील युवकाचे अपहरण करून त्याला सक्तीने मालमत्तेच्या विक्रीकरारावर स्वाक्षरी करण्यास त्याने भाग पाडल्याची तक्रार पणजी पोलीस स्थानकात करण्यात आली होती. पणजी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करून जेनिटोच्या साथिदारांना अटक केली होती, परंतु जेनिटो सापडला नव्हता.

...म्हणून  शरणागती
इतका काळ पोलिसांना गुंगारा देत राहिलेला जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण आला हे काहींना आश्चर्य वाटण्यासारखे असले तरी त्याच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. एक म्हणजे त्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीनचा अर्ज पणजी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. या प्रकरणात त्याने सत्र न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठात आव्हान दिले असले तरी स्वत: जेनिटो हा तपासासाठी सहकार्य करीत नसल्याचे त्याने बेपत्ताराहून सिद्ध केले होते. त्यामुळे खंडपीठात जाऊन फार काही मोठे पदरात पडणार नाही याचा अंदाज आल्यामुळे शरणागतीशिवाय दुसरा पर्याय त्याच्या त्याच्याकडे नव्हता.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

 

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

 

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

Web Title: SantaCruz gang war case, gangster Zenito Cardoz surrenders to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.