Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 02:50 PM2020-08-12T14:50:50+5:302020-08-12T14:56:18+5:30

Sushant Singh Rajput Suicide : मंगळवारी ही तक्रार मुंबईतील न्यू पनवेल येथे राहणाऱ्या अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. ते महाराष्ट्र करणी सेनेशी संबंधित आहेत.

Sushant Singh Rajput Suicide: New turn! Filed a complaint against Patna police in Mumbai | Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

Next
ठळक मुद्देतक्रारी पत्रात निरीक्षक कैसर यासीन, मनोरंजन भारती, उपनिरीक्षक निशांत आणि दुर्गेश यांची नावे आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत.पाटण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे तपास करण्यासाठी मुंबईला गेलेल्या पाटणा पोलिसांच्या पथकाविरुध्द ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला आणखी एक नवीन वळण आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केल्यानंतर पाटण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे तपास करण्यासाठी मुंबईला गेलेल्या पाटणा पोलिसांच्या पथकाविरुध्द ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी ही तक्रार मुंबईतील न्यू पनवेल येथे राहणाऱ्या अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. ते महाराष्ट्र करणी सेनेशी संबंधित आहेत.

पाटणा पोलिस पथकाविरोधात तक्रार

तक्रारी पत्रात निरीक्षक कैसर यासीन, मनोरंजन भारती, उपनिरीक्षक निशांत आणि दुर्गेश यांची नावे आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत. असा आरोप केला जातो की पाटणा पोलिसांना मुंबईत चौकशी करण्याचा अधिकार नव्हता. पाटणा पोलिसांनी 'झिरो एफआयआर' दाखल करून मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण हस्तांतरित करायला हवे होते. पण तसे न करता पाटणा पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईत येऊन स्वत: चा शोध सुरू केला.

सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप

पाटणा पोलिसांच्या पथकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली. या कारणास्तव त्यांनी पाटणा पोलिसांच्या पथकाविरोधात एफआयआर दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईत त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  मुंबई पोलीस या प्रकरणात सातत्याने चौकशी करत होते. त्याचवेळी सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: New turn! Filed a complaint against Patna police in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.