शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

बनावट लसीकरण प्रमाणपत्राची दीड हजारात विक्री; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 9:10 AM

गोरेगाव पश्चिमेकडील काही जण बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलीस हवालदार सतीश कांबळे यांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने पालिका अधिकाऱ्याच्या सोबतीने मंगळवारी छापा टाकला.

मुंबई :  लस न घेताही अवघ्या दीड हजार रुपयात लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सहाद साजीक शेख (२१) आणि माविया अब्दुल हक भरणिया (२१) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. गोरेगाव पश्चिमेकडील काही जण बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलीस हवालदार सतीश कांबळे यांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने पालिका अधिकाऱ्याच्या सोबतीने मंगळवारी छापा टाकला. यादरम्यान शेख आणि भरणिया गुन्हे शाखेच्या हाती लागले. ही दुकली दीड हजार रुपयात लस न घेता नागरिकांना बनावट प्रमाणपत्र मिळवून देत होते. आतापर्यंत ७५ नागरिकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले. हे आरोपी गुजरातमधून रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले. यात आणखीन कोणाचा सहभाग आहे? याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे.