नापास करण्याची धमकी देत विद्यार्थीनीसोबत शाळेतच शिक्षकांकडून बलात्कार; गर्भवती झाल्यानंतर झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 21:24 IST2021-06-10T21:23:32+5:302021-06-10T21:24:20+5:30
Rape Case : मुलगी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत गेली होती. तिथे तिच्या दोन शिक्षकांनी तिला गोड बोलून एका खोलीत नेले.

नापास करण्याची धमकी देत विद्यार्थीनीसोबत शाळेतच शिक्षकांकडून बलात्कार; गर्भवती झाल्यानंतर झाला खुलासा
जयपूर - राजस्थानात एक लज्जास्पद घटना घडली आहे. या घटनेत शिक्षकांनी विद्यार्थिनीची अब्रू लुटली आहे. याशिवाय गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फसला आहे. ही राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात घडली आहे. एका माध्यमिक शाळेच्या दोन शिक्षकांनी मिळून एका सहावी इयत्तेतील विद्यार्थीनीवर बलात्कार केला. या घटनेमुळे राजस्थान हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शिक्षकांविरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना जोधपूरच्या मोकमगढ भागातील एका सरकारी शाळेत घडली आहे. पीडितेची अचानक तब्येत बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याचे उघड झालं. त्यावेळी तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन चर्चा केली. यावेळी तिने रडत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कुटुंबियांना माहिती दिली.
मुलगी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत गेली होती. तिथे तिच्या दोन शिक्षकांनी तिला गोड बोलून एका खोलीत नेले. त्यानंतर किळसवाणे कृत्य केलं. आरोपी शिक्षक एवढ्यावरच थांबले नाहीत तर नापास करु अशी धमकी देऊन आरोपींनी तीन ते चार वेळा तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय कुणालाही याबाबत न सांगण्याचं बजावलं, अशी माहिती पीडितेने कुटुंबियांना दिली. सर्व प्रकार समजून घेऊन पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी तातडीने आरोपी शिक्षकांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Anil Deshmukh Case : सीबीआयविरोधातील राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी १८ जूनलाhttps://t.co/dD5pqHgzQ1
— Lokmat (@MiLOKMAT) June 10, 2021