शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या लग्नाला यायचं हा...", PDF कार्ड उघडताच बँक अकाऊंट झालं खाली, ७५ हजारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:46 IST

लग्नाचं आमंत्रण एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.

सोशल मीडियावरच हल्ली लग्नाचं, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचं आमंत्रण एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.  त्याला हजारो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील अनेक लोकांसोबतही असंच घडल्याचं आता समोर आलं आहे.

राजकोटच्या कोलीथड गावातील रियाज भाई गाला यांच्यासोबत भयंकर प्रकार घडला. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना त्यांचे नातेवाईक ईशान भाईकडून फोनवर एक मेसेज आला - "माझ्या लग्नाला नक्की यायचं हा..." असा मेसेज होता. त्यासोबत एक पीडीएफ फाइलही होती. रियाज भाई आनंदी झाले, त्यांनी विचार केला की लग्नाची पत्रिका पाहूया, पण हे कार्ड प्रत्यक्षात सायबर गुन्हेगारांनी रचलेला सापळा होता.

रियाज यांनी फाइल डाउनलोड करताच त्यांच्या फोनचा कंट्रोल हॅकर्सच्या हातात गेला. सुरुवातीला फक्त १ रुपया कापला गेला, नंतर हळूहळू संपूर्ण ७५,००० रुपये गायब झाले. रियाज यांना काही समजेपर्यंत त्यांच्या कष्टाचे सर्व पैसे दुसऱ्याच्या खिशात गेले होते.

रियाज भाई एकटे नव्हते. कोलीथड गावातील शेतकरी शैलेश भाई सावल्या यांच्या बाबतीतही असंच धक्कादायक घडलं आहे. दिवसभर शेतात कष्ट करणाऱ्या शैलेश भाईंनाही असंच एका लग्नाचं आमंत्रण मिळालं. त्यांनी फाइल डाउनलोड केली आणि काही वेळातच त्यांच्या खात्यातून २४,००० रुपये गायब झाले. या घटनांमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMONEYपैसाGujaratगुजरात