शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या एका महिन्यातच नववधूचा मोठा कांड, सासूच्या जेवणात विष टाकून दागिने-पैशांसह झाली फुर्रर्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:37 IST

Rajasthan Alwar Looteri Dulhan News: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच सुनेने सासूच्या खिचडीत विषारी पदार्थ मिसळून घरातील दागिने व रोकड घेऊन पोबारा केला.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच सुनेने सासूच्या खिचडीत विषारी पदार्थ मिसळून घरातील दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर नवरदेवासह त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. फरार झालेली नववधू लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीतील सदस्य असल्याचे समजत आहे. सध्या या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा असून, अशा फसव्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमजीत असे फसणवूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी बबली कौर नावाच्या महिलेने विक्रमजीतची ओळख पिंकी कौरशी करून दिली.  पिंकीने स्वतःला लग्न जुळवणारी असल्याचे सांगून तिची भाची रेखा कौर हिच्याशी त्याचे लग्न जुळवून देण्याचे ठरवले. विक्रमजीतला कोर्टात बोलावून रेखासोबत लिव्ह-इन रिलेशनशिप करार करण्यात आला. त्यानंतर ६० फूट रोडवरील एका गुरुद्वारात मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न पार पडले. या लग्नात विक्रमजीतने सुमारे ५ लाख रुपये खर्च केले.

नेमके काय घडले?

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र, काही दिवसानंतर रेखाचे वागणे बदलले. ती छोट्या गोष्टींवरून घरात वाद घालू लागली. घटनेच्या दिवशी रेखाने सासूच्या खिचडीत विषारी पदार्थ मिसळला. सासूने खिचडी खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. धक्कादायक बाब म्हणजे, सासूला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा रेखाने घरातील कपाटातील सोन्याचा हार आणि मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे दागिने व पैंजण आणि ३० हजार रुपये रोख घेऊन घरातून पळ काढला.

नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली

जेव्हा विक्रमजीतने या प्रकरणाचा स्वतःहून छडा लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समोर आलेल्या सत्याने त्याला धक्का बसला. रेखा विवाहित असून तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला नव्हता. तिला पहिल्या पतीपासून दोन मुलेही आहे. विक्रमजीतने मध्यस्थी करणाऱ्या पिंकी कौरला जाब विचारला, तेव्हा तिने उद्धट उत्तर दिले. "ज्या लग्नाला मी नवीन सुरुवात मानत होतो, तो केवळ एक बनाव होता. माझ्या कुटुंबाच्या जिवाशी खेळून त्यांनी लाखो रुपयांची लूट केली आहे", अशा शब्दांत विक्रमजीतने आपले दुख: व्यक्त केले.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लग्न ठरवताना समोरच्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी, ओळखपत्रे आणि मध्यस्थांची विश्वासार्हता तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bride poisons mother-in-law, flees with valuables month after wedding.

Web Summary : Rajasthan: A newlywed poisoned her mother-in-law's food, stealing jewelry and cash. The groom, Vikramjit, discovered she was part of a scam marriage ring. Police are investigating, urging caution against such fraudulent schemes after the bride fled.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान