Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 23:28 IST2025-06-09T22:58:10+5:302025-06-09T23:28:03+5:30

Sonam Raghuvanshi news: शिलाँगला राजाला हनिमूनला नेत तिथे प्रियकर राज याने पाठविलेल्या गुंडांकडून राजाची हत्या करण्यात आली होती. त्यांना पकडताच रातोरात सोनम देखील उत्तर प्रदेशातील गाझीपुरमधील एका धाब्यावर दाखल झाली होती.

Raja's wife Sonam Raghuvanshi remanded in police custody for three days; Meghalaya Police will take her to Guwahati by plane, from there to Shillong | Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार

Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार

पती राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिलाँगला राजाला हनिमूनला नेत तिथे प्रियकर राज याने पाठविलेल्या गुंडांकडून राजाची हत्या करण्यात आली होती. त्यांना पकडताच रातोरात सोनम देखील उत्तर प्रदेशातील गाझीपुरमधील एका धाब्यावर दाखल झाली होती. तिची वैद्यकीय तपासणी करून गाझीपूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. 

रात्री उशिरा शिलाँग पोलिसांनी सोनम रघुवंशीला गाझीपूरच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शिलाँग पोलिसांचे अपील स्वीकारले आणि सोनमला ७२ तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठविले आहे. 

हत्येच्या कटात सोनमची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि तिला शिलाँगला घेऊन जाऊन तिची चौकशी करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी सांगितले. तिने प्रियकर राजसोबत राजाच्या हत्येचा कट रचला आणि राजने पाठविलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सनाही ती भेटली होती. यानंतर राजाची हत्या करून हे चौघे मेघालयमधून पळाले होते. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यास तपास करता येईल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. 

आता पोलीस कोठडी मिळाल्याने सोनमला गाझीपूरहून बिहारमधील पटना विमानतळावर रस्तेमार्गे नेले जाणार आहे. यानंतर तिला विमानाने गुवाहाटीला नेले जाणार आहे. तेथून शिलाँगला हलविले जाणार आहे. या प्रवासात एक महिला पोलिसांची टीम उपस्थित असणार आहे. 

सोनमच्या या विश्वासघातामुळे मेघालयची पुरती बदनामी झाली आहे. सोनमच्या दिराने मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. तसेच सरकारवरही केले होते. मध्य प्रदेशच्या नेत्यांनी राजकीय ताकद वापरत मेघालयवर दबाव आणला होता. राजा आणि सोनम हनिमूनला शिलाँगला गेले होते. यामुळे हे प्रकरण नाजूक बनले होते. 

Web Title: Raja's wife Sonam Raghuvanshi remanded in police custody for three days; Meghalaya Police will take her to Guwahati by plane, from there to Shillong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.