राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:16 IST2025-06-10T19:15:10+5:302025-06-10T19:16:04+5:30
हे सर्च ऑपरेशन म्हणजे राजा रघुवंशी हत्येशी संबंधित तपासाचा एक भागा असल्याचे गुन्हे शाखेच्या ACP पूनमचंद यादव यांनी म्हटले आहे...

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
संपूर्ण देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाच्या तपासाला आता वेग आला आहे. मेघालय पोलिसांच्या चमूने इंदूर गुन्हे शाखेच्या साथीने मंगळवारी इंदूरमधील नंदबागमध्ये विशाल उर्फ विक्की चौहानच्या घरावर छापा टाकला आणि तेथे सर्च ऑपरेशन केले. या सर्च ऑपरेशनमध्ये पुलिसांनी काही कपडे जप्त केले आहेत. जे परिधान करून विशालने राजा रघुवंशीची हत्या केली होती. याशिवाय इतरही काही गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.
चावी गायब, गेटवरून उड्या मारून छापेमारी -
विशालच्या घरी पोहोचलेल्या पोलिसांच्या चमूला घराची चावी मिळाली नाही. यानंतर पोलिसांनी गेट ओलांडून आरोपीच्या घरात प्रवेश केला आणि घराची झाडाझडती घेतली. यावेळी, हे सर्च ऑपरेशन म्हणजे राजा रघुवंशी हत्येशी संबंधित तपासाचा एक भागा असल्याचे गुन्हे शाखेच्या ACP पूनमचंद यादव यांनी म्हटले आहे.
कपडे महत्वाचा पुरावा -
सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या घरातून पोलिसांना काही महत्त्वाचे साहित्य सापडले आहे. इंदूर गुन्हे शाखेने यासंदर्भात अद्याप पूर्ण माहिती दिलेली नाही. तथापि, सर्वात महत्वाचे ते कपडेच आहेत, ज्यांवर रक्ताचे डाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
VIDEO | Raja Raghuvanshi murder case: Shillong Police (Crime Branch) searched the residence of one of the accused, Vishal Chauhan, in Rakhi Nagar earlier today.
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/Juwg0euIeN
अटकेतील आरोपी असे -
राज कुशवाह - हा सोनमच्या वडिलांच्या दुकानात काम करत होता. मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. सोनम सोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरू होते.
विशाल चौहान - रॅपिडो बाइक चालवतो. राजचा मित्र आहे. ललितपूरचा रहिवासी आहे.
आकाश राजपूत - बेरोजगार आहे, इंदूरमध्ये राहतो, राजच्याच मोहल्ल्यात राहतो.
आनंद कुर्मी - याला बीना येथून अटक करण्यात आली. हा सागर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सुपारी किलिंगमध्ये सामील.
सोनम रघुवंशी - राजाची पत्नी, हत्येची मास्टरमाइंड, प्रियकर राजसाठी पतीची हत्या करवली.