शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

सायको किलर! दुचाकीस्वारला रस्त्यात अडवून संपवलं, मग मृतदेहाचं मांस खाऊन रक्तही प्यायलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:59 IST

Madhya Pradesh Damoh Crime: मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. एका सायको किलरने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या असून, भररस्त्यात हे अंगावर काटा आणणारे राक्षसी कृत्य केले.

मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. भररस्त्यात एका दुचाकीस्वाराचा निर्घृण हत्या करण्यात आली असून मृताच्या शरीराचे मांस खाऊन रक्त प्यायल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या राक्षसी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समन्ना गावात ही घटना घडली. अर्थखेडा येथील रहिवासी भरत विश्वकर्मा हा आपल्या दुचाकीवरून बहिणीच्या घरी जात असताना आरोपीने त्याच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भरत दुचाकीवरून जमिनीवर कोसळला. त्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने त्याच्यावर अनेक वेळा वार केले. मात्र, त्यानंतर आरोपीने जे काही केले, ते पाहिल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.  

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरतची हत्या केल्यानंतर आरोपीने आरोपी रस्त्याच्या मधोमध बसून त्याचे मांस खाल्ले आणि रक्त प्यायले. कॉलनीतील लोकांनी आपल्या बाल्कनीतून हा भयानक प्रकार पाहिला आणि काहींनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, आरोपीने पोलिसांवरही हल्ला केला. अखेर पोलिसांनी सर्व बाजूंनी घेराव घालून त्याला बेड्या ठोकल्या.  

आरोपी मनोरुग्ण असल्याची शक्यता

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मृत भरत विश्वकर्मा आणि आरोपी यांच्यात कोणताही जुना वाद नव्हते. आरोपी मनोरुग्ण असावा आणि त्याने वेडेपणाच्या भरात हे कृत्य केले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Psycho Killer! Man murdered, cannibalized on street in Madhya Pradesh.

Web Summary : In Madhya Pradesh, a man was brutally murdered in broad daylight. The accused cannibalized the victim and drank his blood. Police arrested the suspect, sparking terror in the area. Investigation underway; mental illness suspected.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी