शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बाॅबीचा साथीदार ऑगीच्या शोधात पोलीस; गांजा प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण जिल्हयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 21:05 IST

Drug Case : पोलीस एजंटच्या शोधात

ठळक मुद्दे या प्रकरणात सावंतवाडी व कणकवली येथील एंजट रडारवर असून अनेकजण नाव येण्याच्या भीतीने भुमिगत झाले आहेत.तर आपल्याकडे असलेला साठा ही नाहीसा करून टाकला आहे.

सावंतवाडी : सावंतवाडीत गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असून,या रॅकेटचे धागेदोरे हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरले असल्याचे पुढे येऊ लागले आहे. कुडाळ पोलीसा समोर या प्रकरणातील सुत्रधार बाॅबी हजर झाल्यानंतर पोलीस त्याचा सावंतवाडीतील साथीदार ऑगीच्या शोधात आहेत. या प्रकरणात सावंतवाडी व कणकवली येथील एंजट रडारवर असून अनेकजण नाव येण्याच्या भीतीने भुमिगत झाले आहेत.तर आपल्याकडे असलेला साठा ही नाहीसा करून टाकला आहे.

सावंतवाडी येथील गांजा रॅकेटची पाळे मुळे संपूर्ण जिल्हयात पसरली असून कुडाळ पोलिसांसमोर दिवसेदिवस वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने पोलीस ही चांगलेच चक्रावून गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात गांजा विक्रीचे रॅकेटची पाळेमुळे पसरली असून त्या दृष्टीने पोलिस शोध घेत आहेत. त्यातच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आकेरी जवळ सावंतवाडीतील दोघां युवकांना ताब्यात घेतले यात मयूरेश कांडरकर व आशिष कुलकर्णाे यांचा समावेश होता तर अतुल उमेश गवस या युवकांला कुडाळ पोलीसांनी ताब्यात घेतले त्याच्या जबाबात सावंतवाडीतील बॉबी उर्फ फैैजल बेग यांचे नाव आले होते सध्यातरी बेग हाच मुख्य सुत्रधार असल्याचे पोलीसांना वाटत असून त्याच्या घरात तब्बल ३ किलो गांजा आढळून आला होता या सर्वाना सोमवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान बाॅबीने एवढा गाज्याचा साठा कोठून घेतला कुणाला देत होता तसेच यात कोण कोण दलाली करीत होते. त्या सर्वाचा शोध पोलिस घेणार असून पोलिसांनी या गुन्हयात आरोपी भोवती चांगलाच फास आवळला असून. बाॅबी हा रविवारी पोलिसांसमोर हजर झाला पोलीसांनी त्याच्याकडून घेतलेल्या माहितीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात सध्यातरी बाॅबीला साथ देणारा ऑगी हा पोलीसांना हवा असून कुडाळ चे पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत आहे.मात्र त्याचा ठावठिकाणा अद्याप सापडला नाही ऑगी च्या व्यतिरिक्त आणखी सावंतवाडीतील  काहि युवकही पोलिसांच्या रडारवर असून हे सर्व जण  अमली पदार्थ बाहेरून आणून विक्री करत असल्याचे पोलीसाचे म्हणने आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसArrestअटकSawantwadiसावंतवाडी