शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कर्नाटकातील स्फोटकाबाबत शिवसेना आमदाराची पोलिसांनी केली चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 8:44 PM

बदनामीचे षडयंत्र; प्रकाश आबिटकर यांची माहिती 

ठळक मुद्दे महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ; एसआयटीच्या पथकाकडून सखोल चौकशी कोल्हापूरचे एटीएसचे पथक हुबळीमध्ये ठाण मांडून असून चौकशी करीत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कोल्हापूर - कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटातील बकेटवर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (रा. गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असा कन्नड, तामिळी आणि इंग्रजी भाषेत नामोल्लेख आढल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी आमदार आबिटकर यांचेकडे तासभर चौकशी केली. या प्रकरणाशी काही संबध नसून आपल्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले आहे. स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटूंबियांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार आबिटकर यांनी केली. कोल्हापूरचे एटीएसचे पथक हुबळीमध्ये ठाण मांडून असून चौकशी करीत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

स्फोटकावर शिवसेनेचे आमदार आबिटकर यांच्या नावाचा उल्लेख मिळून आल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली. आबिटकर हे राधानगरी-भुदरगड येथील विद्यमान आमदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार असल्याने कोल्हापूरसह कर्नाटक एटीएस, एसआयटीसह रेल्वे पोलीसांचे त्यांचेकडे लक्ष लागले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी याप्रकरणी आमदार आबिटकर यांचेकडे तासभर चर्चा केली. कर्नाटकशी तुमचे काही कनेकशन आहे का, काही व्यवहार आहेत का, कोणी तुमच्याकडून दूखावले आहे का आदी माहिती घेतली. विधानसभा निवडणुक कालावधीत आबिटकर यांचा नामोल्लेख स्फोटकांच्या बकेटवर कसा आला, त्या यंत्रणेपर्यंत पोहचण्यासाठी कोल्हापूर आणि कर्नाटक पोलीस संयुक्त तपास करीत असलेचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

 

बदनामीचे षडयंत्र - प्रकाश आबिटकरसामाजिक, राजकीय क्षेत्रात वावरताना अशा घटनांशी आपला यापूर्वी कधीही दुरान्वयेही संबध आला नाही. दिवसभर आपल्या नावाची मिडीयाद्वारे चर्चा पुढे आल्याने आपण स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांची भेट घेवून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी क ेली आहे. आपल्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले आहे. स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबीयांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधित रॅकेटचा छडा लावावा, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Blastस्फोटrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसShiv SenaशिवसेनाMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक