शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा खबरी निघाला गोळीबार प्रकरणातील आरोपी: पाच लाखांमध्ये दिली होती सुपारी

By जितेंद्र कालेकर | Updated: December 2, 2019 20:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पाच लाखांची सुपारी घेऊन कल्याण येथील केबल व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी ...

ठळक मुद्देखंडणीविरोधी पथकाची कारवाई ५० हजारांमध्ये विकले पिस्तूल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पाच लाखांची सुपारी घेऊन कल्याण येथील केबल व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अब्दुल कादीर पटेल ऊर्फ मुन्ना (३३, रा. दूधनाका, कल्याण) या आणखी एका सातव्या आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. यातील सहा आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.अब्दुल कादीर याचा कल्याणच्या दूधनाका परिसरात चिकनपुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यानेच हल्लेखोर निहाद करेल याला ५० हजारांमध्ये पिस्तूल विकले होते. याच पिस्तूलने मुन्वर शेख आणि इर्शाद कुरेशी या दोघांनी गोळीबार केल्याचे तपासात समोर आले. मुन्ना याचे ठाणे आणि मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयांमध्ये वेगळे वलय आहे. त्यामुळेच तो गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांकडे ‘खबरी’ म्हणूनही काम करीत होता. बड्या अधिका-यांकडे आपली ऊठबस असल्यामुळे कोणी आपल्याला हात लावणार नाही, असाही समज त्याच्यामध्ये होता. त्याला अटक केल्याने ठाण्यातील अशा अनेक खब-यांचे धाबे दणाणले आहेत.हल्लेखोरांपैकी एक इस्माईल मांडेकर याच्या बहिणीला पैशांसाठी मुद्दसर ऊर्फ गुड्डू मसजिद (३९, रा. बाजारपेठ, कल्याण) याने मारहाण केल्याने इस्माईल या मेहुण्यानेच निहाद करेल याला सुपारी दिल्याचेही यात स्पष्ट झाले. कल्याणमधील बाजारपेठ भागातील व्यापारी मुद्दसर यांच्यावर २९ आॅक्टोबर २०१९ रोजी वालधुनी येथे मोटारसायकलने आलेल्या दोघांनी पिस्तूलमधून दोन राउंड गोळीबार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जे.डी. मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम आणि पोलीस हवालदार नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने मुन्वर याच्यासह इर्शाद कुरेशी (२८, रा. राबोडी, ठाणे), शैबाज पोके (२४), अफताब शेख (१९), निहाद करेल (२८, तिघेही रा. कोनगाव, भिवंडी) आणि इस्माईल मांडेकर ऊर्फ बाबा (२९, रा. कल्याण) या सहा जणांना अटक केली. यातील मुन्वर आणि इर्शाद या दोघांनी पिस्टलमधून गोळीबार केल्याचे तपासात उघड झाले. हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल खरेदीसाठी निहाद याला मेहुण्याचा काटा काढण्यासाठीच इस्माईल याने आर्थिक मदत केली. दरम्यान, मुन्ना याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक