Next

जत्रेत फुगे फोडणारा मुलगा चालला ऑलिम्पिकला; नेमबाज सौरभ चौधरी सांगतोय यशाचं गमक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 01:57 PM2019-02-25T13:57:47+5:302019-02-25T13:58:15+5:30

नवी दिल्ली : भारताचा 16 वर्षीय नेमबाज  सौरभ चौधरीनं  रविवारी ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव ...

नवी दिल्ली : भारताचा 16 वर्षीय नेमबाज  सौरभ चौधरीनं  रविवारी ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानं 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात 245 गुणांच्या विश्व विक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले. प्रथमच वरिष्ठ स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होताना त्याने या अविश्वसनीय कामगिरीसह 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही जिंकले. 2016 नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अंतिम फेरीत एकदाही पराभूत न होण्याचा सपाटा सौरभने लावला आहे.

टॅग्स :गोळीबारShooting