शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त

By राजन मगरुळकर | Updated: April 29, 2025 22:51 IST

घराच्या झडतीत गावठी पिस्तुल, तलवारी, घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली

राजन मंगरुळकर, परभणी : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नांदखेडा येथून एका सराईत गुन्हेगाराच्या घरातून आणि वाहनातून गावठी पिस्टल, तलवारी आणि इतर घातक शस्त्र जप्त केले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. यामध्ये एक अवैध अग्निशस्त्र, चार जिवंत काडतूस, तीन तलवारी, एक खंजर, गुप्ती, कत्ती, राँड आणि चारचाकी वाहन असा एकूण दहा लाख ३७ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी परभणी ग्रामीण ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद केला. संबंधित काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यावरुन केलेल्या कारवाईत पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. 

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा पथकाला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. नांदखेडा येथील सराईत गुन्हेगार शेर खान पठाण व त्याचे काही मित्र हे राहत्या घरी व तो वापरत असलेल्या वाहनांमध्ये धारधार हत्यार, अग्निशस्त्र बाळगून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यावरून पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व पथकाने नांदखेडा येथे शेर खान पठाण यास शिताफिने सापळा रचून पकडले. त्याच्यासोबत अन्य एक सराईत गुन्हेगार हनुमंत रमेश सोनटक्के (रा.वाणी पिंपळगाव, ता.पालम) हा मिळून आला. त्याच्या ताब्यातील (एमएच २३ एआर २९३९) मध्ये घातक अग्निशस्त्र व तलवार मिळून आले. घर झडतीमध्ये सुद्धा घातक शस्त्र मिळाले. नमूद दोघांवर अन्य काही ठिकाणी यापूर्वी गुन्हे नोंद आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस