शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

‘फोन पे’ची सेफ गोल्ड गुंतवणूक ठरली ‘फेक’; लिंक क्लिक करताच तरुणीचे ४ लाख गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:56 IST

योजनेत गुंतवणूक केल्यास तेवढीच रक्कम कॅशबॅक (परत) मिळेल असे आमिष दाखविले.

ठळक मुद्देतरुणीने फोन पेवरून ९९९ रुपये आणि ४९९ रुपये ऑनलाईन पाठविले. तरुणीचे बँकखाते भीम अ‍ॅपसोबत जोडण्यात आले

औरंगाबाद : फोन पेवरून व्यवहार करणाऱ्या तरुणीला सेफ गोल्ड योजनेच्या नावाखाली ४ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले. या फसवणुकीसंदर्भात तरुणीने गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

व्यंकटेशनगर येथील तरुणी ही शासकीय ज्ञान, विज्ञान आणि कला महाविद्यालयात शिक्षण घेते. तिचे भारतीय स्टेट बँकेत बचत खाते आहे. या खात्यांतर्गत तिने वेळोवेळी बचत करून ३ लाख ८४ हजार ९९९ रुपये मुदत ठेव ठेवली होती. तर दैनंदिन खर्चासाठी स्वतंत्र रक्कम ठेवली होती. तिने तिचे एटीएम कार्ड बँकेला मेसेज पाठवून ब्लॉक केले होते. तेव्हापासून तिने तिच्या मोबाईलवर फोन पे हे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करून त्यावरून ती व्यवहार करीत होती. ३० नोव्हेंबर रोजी तिला एका मोबाईलवरून फोन आला. फोन करणाऱ्याने त्याचे नाव मनोज असे सांगितले आणि तो फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे त्यांना म्हणाला. त्याच्या कंपनीची सेफ गोल्ड इन्व्हेस्टमेंट ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तेवढीच रक्कम कॅशबॅक (परत) मिळेल असे आमिष दाखविले. तुम्हाला एक लिंक पाठवीत आहोत. त्यावर क्लीक करून रक्कम पाठवा, असे सांगितल्यानंतर तरुणीने फोन पेवरून ९९९ रुपये आणि ४९९ रुपये आॅनलाईन पाठविले.

मात्र, तिला रक्कम परत मिळाली नाही. एवढेच नव्हे तर सेफ गोल्डचे नोटीफिकेशनही तिला मिळाले नाही. यानंतर तिच्या फोन पे अ‍ॅप्लीकेशनवर वारंवार नोटीफिकेशन आले आणि तिने ते नाकारले. तिच्या खात्यातील रक्कम कमी होत गेली. पुन्हा तिला कॉल आला तेव्हा तिला गुंतवणूक करायची नाही. तिची रक्कम तिने परत मागितली. मात्र त्याने ही रक्कम परत केली नाही.  ३० नोव्हेंबर ते  ८ डिसेंबरदरम्यान ३ लाख ९७ हजार ५८९ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार तिने पोलिसांत नोंदविली. पोलीस निरीक्षक के. सी. देशमाने तपास करीत आहेत.

तरुणीने मेसेजवर ठेवला विश्वास३ डिसेंबर रोजी भामट्याने तिला कॉल करून तुमची रक्कम तुम्हाला परत करण्यासाठी एक मेसेज पाठविला आहे. हा मेसेज कॉपी करून पाठवा. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने मेसेज पाठविल्यानंतर तिचे बँकखाते भीम अ‍ॅपसोबत जोडण्यात आल्याचा मेसेज आला आणि त्याच दिवशी तिच्या खात्यातून ३४ हजार ९९८ रुपये कपात झाले. ३० हजार रुपये, ३१ हजार १०० रुपये, ९९ हजार ९९७ रुपये, ९९ हजार ९९८ रुपये कपात झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसonlineऑनलाइनfraudधोकेबाजी