शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:51 IST

घराच्या शिफ्टिंगदरम्यान सापडलेल्या कागदपत्राने गौरीला धक्का

मुंबई : डॉ. गौरी पालवे हिचा विवाह वडिलांनी थाटात अनंतसोबत लावून दिला. मात्र, काही दिवसांतच अनंतने छोट्या छोट्या कारणातून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यात, घराच्या शिफ्टिंगदरम्यान हाती लागलेल्या कागदपत्राने तिच्या पायाखालची जमीन सरकली.  २०२१ रोजीचे लातूरच्या एका  गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता. त्यात, महिलेच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते. त्यामुळे अनंतच्या अनैतिक संबंधाचा संशय खरा ठरला. तेव्हापासून ती मानसिक तणावात होती. याबाबत अनंतकडे जाब विचारताच त्याने तिला आत्महत्या करून चिठीत गौरीचे नाव लिहिण्याची धमकी दिल्याने ती आणखी खचल्याचे गौरीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. 

गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घराच्या शिफ्टिंगदरम्यान गौरीच्या हाती लागलेली कागदपत्र तिने व्हॉट्सॲपवर पाठविली. त्यात, एका गर्भवती महिलेच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते. त्या कागदपत्रावरून अनंत याचे संबंधित महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत तिने रडण्यास सुरुवात केली. वडिलांनी तिच्याकडे येत असल्याचे सांगताच तिने त्यांना नकार दिला. अनंतला आवडणार नाही म्हणत तिने येण्यास नकार दिला. 

पतीची आत्महत्येची धमकी  ३ ऑक्टोबर रोजी अनंतच्या वाढदिवसानिमित्ताने आई - वडिलांनी काहीही न कळवता तिचे घर गाठले. तेव्हा, गौरी हिच्या चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. आई - वडिलांना पाहून ती घाबरली. तुम्ही जा, असे ती सांगत होती. अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने याबाबत  तुला काय करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही,  याबाबत कोणाला सांगितले तर, तुझे नाव चिठीत लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे तिने आई - वडिलांना सांगितले. त्याने मारहाण केल्याचेही तिने सांगितले. 

दुसऱ्या लग्नाची धमकी गर्जेचा भाऊ आणि बहिणीला त्यांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती होती. तुझे अनंतसोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावेन, अशी धमकी नणंद शीतल आंधळे देत असल्याचेही गाैरीने सांगितले. 

योग्य तपास व्हावा : पंकजा मुंडेडॉ. गौरी यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, शनिवारी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठीही खूप धक्कादायक होती.

मी तिच्या सहकारी डॉक्टर मैत्रिणींशी बोलले, त्यांचे म्हणणे आहे, ती  खूप साधी होती, पण खूप स्ट्राँग होती, आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती,  पंकजा मुंडे यांनी पोलिसांना फोन करून माझा पीए असला तरी योग्य कारवाई करा, असे म्हणणे अपेक्षित होते. - अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

English
हिंदी सारांश
Web Title : Wife devastated by affair, parents' surprise visit reveals abuse.

Web Summary : Gauri discovered her husband Anant's affair through documents. He threatened suicide if she revealed it. Her parents found her injured and scared during a visit. Harassment from in-laws was also reported. Pankaja Munde calls for thorough investigation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDr, Gauri Palve Anant Garje Caseडॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण