शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

क्रेडिट कार्डजवळ असताना ऑनलाईन फसवणूक ; आठवड्यात पोलिसांनी सव्वातीन लाख मिळवून दिले परत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 7:32 PM

डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड जवळ असतानाही ऑनलाईन व्यवहार होऊन खात्यातून पैसे काढले गेले़.

पुणे : डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड जवळ असतानाही ऑनलाईन व्यवहार होऊन खात्यातून पैसे काढले गेलेल्या ८ जणांचे सायबर पोलीस ठाण्याने एका आठवड्यात ३ लाख २४ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत़. ऑनलाईन व्यवहार झाल्यानंतर ज्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व त्यांना संबंधित मर्चट अथवा वॉलेट यांच्याशी संपर्क साधून ही रक्कम रिफंड करण्यात मदत करण्यात आली आहे़. अक्षय भेंडे यांचे क्रेडिट कार्डजवळ असताना त्यांच्या खात्यावरुन अनधिकृत व्यवहार होऊन ८० हजार रुपये काढले गेले़. पोलिसांनी तात्काळ पे यु या मर्चंटशी संपर्क साधून त्या वॉलेटमध्ये शिल्लक असलेले ९ हजार ४०० रुपये परत मिळवून दिले़. एका खातेदाराच्या खात्यातून ऑनलाईन व्यवहार झाला़. पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेशी पत्रव्यवहार करुन सर्व १३ हजार ७२ रुपये रिफंड करण्यात आले़ अभिजित कुमार सिंग यांचे क्रेडिट कार्डजवळ असताना २५ हजार रुपये काढले गेले़ .आयसीआयसी बँकेने हे सर्व पैसे परत केले़. डॉ़. हरीप्रसाद यांच्याजवळ डेबिड कार्ड असताना खात्यातून १ लाख २ हजार रुपये काढले गेले़. त्यांना संपूर्ण रक्कम परत करण्यात आली़. शरद जोशी यांचे पेटीएमद्वारे ४६ हजार रुपये गेले होते़. त्यांना सर्व पैसे रिफंड करण्यात आले़. जॉन जोसेफ कलरीकल यांचे अ‍ॅक्सेस बँकेच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होऊन ७० हजार ९६५ रुपये काढले गेले़. त्यापैकी ओला कॅब, फिव्हचर पे, फोन पे यांच्याकडून ७० हजार ९६५ रुपये रिफंड करण्यात आले़. मोम्महद शहदाब अन्सारी यांनी कोणतीही माहिती शेअर न करता त्यांच्या खात्यातून ३ लाख ९३ हजार रुपये काढले गेले होते़. त्यापैकी सीसी अ‍ॅव्हेन्यू कडून ४९ हजार ९९९ रुपये रिफंड करण्यात आले़ राणी लोखंडे यांना बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे भासवून ८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती़. त्यामध्ये पीसीएमबी भांडुप या बँकेशी तात्काळ पत्रव्यवहार केला असता त्यांना सर्व रक्कम रिफंड करण्यात आली़. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्यामधील अधिकारी व कर्मचारी ही कामगिरी केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम