शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

तोतया पोलिसांचा नवा फंडा ; चक्क १२ कोटींना घातला गंडा, ९ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 1:29 AM

विलेपार्लेच्या बावा इंटरनॅशनलमधील प्रकार; पैशांची बॅग घेऊन पसार

मुंबई :  एक पंचतारांकित हॉटेल, त्यात १२ कोटी रुपये घेऊन आलेले दोन व्यावसायिक, त्यांच्यासोबत व्यवहार करणारे एजंट, त्यांना लुटण्यासाठी दबा धरून बसलेली एक तोतया पोलिसांची टोळी, त्यांना साथ करणारी बाहेरची दुसरी टोळी...काही मिनिटांत चोरी करून लंपास झालेली गँग... नऊजणांना झालेली अटक... हे कोणत्याही हिंदी मसाला चित्रपटाचे कथानक नाही, तर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या गुन्ह्याची हकीकत आहे.

विलेपार्ले पूर्व नेहरू रोडवर असलेल्या हॉटेल बावा इंटरनॅशनलच्या एका खोलीत मुंबई बाहेरून आलेले दोन व्यापारी काही लोकांना भेटण्यासाठी थांबले होते. १७ फेब्रुवारी रोजी पैशांचे व्यवहार सुरू होते. दुपारी चारच्यासुमारास स्वतःला पोलीस म्हणवणारे पाचजण त्यांच्या खोलीत शिरले. त्या पाचजणांनी या व्यापाऱ्यांकडील पैशाची बॅग हिसकावली आणि पळ काढला. त्यावेळी झालेल्या झटापटीत व्यवहारासाठी त्या खोलीत हजर असलेला मध्यस्थ आनंद इंगळे आणि त्या दोन व्यापाऱ्यांना मारहाण झाली.

इंगळे मानखुर्दचा असून, वीज कंपनीमध्ये लेबर पुरविण्याचे काम करतो. त्याने केलेल्या तक्रारीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज शोधले. तसेच स्थानिक खबऱ्यांना कामाला लावले आणि शनिवारी रात्रीपर्यंत  या गुन्ह्याशी संबंध असलेल्या नऊजणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात यश मिळवले.

पोलिसांनी नेमके कोणाला अटक केले, त्यांचा या गुन्ह्यात कसा आणि किती सहभाग होता, याबद्दल काहीही माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दाखवली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून काही रक्कमदेखील हस्तगत करण्यात आली आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे.

...म्हणून सुरक्षा यंत्रणा राहिली गाफील

हॉटेलमध्ये शिरलेल्या त्या पाच जणांनी गेटवरील सुरक्षारक्षकांना आपण पोलीस असल्याचे सांगितले आणि बनावट ओळखपत्रही दाखवले. त्यामुळे त्यांचा हॉटेलातील प्रवेश सोपा झाला.

‘त्यांचा’ फसविण्याचा होता उद्देश!

दोघा व्यावसायिकांचे १२ कोटी रुपये सफेद करून देतो, असे सांगत हॉटेलमध्ये बोलावून घेणाऱ्यांचा उद्देशदेखील त्यांना फसविण्याचाच होता. मात्र, त्या आधीच तोतया पोलिसांनी पैसे उडवले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई