तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 23:19 IST2020-01-18T23:18:59+5:302020-01-18T23:19:03+5:30

६२ वर्षीय वयोवृद्ध महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा प्रकार घडला आहे.

nalasopara Crime news | तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेला लुटले

तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेला लुटले

नालासोपारा  - पश्चिमेकडील राहुल इंटरनॅशनल शाळेजवळील रोडवर शुक्रवारी सकाळी चर्चला प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय वयोवृद्ध महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा प्रकार घडला आहे. नालासोपारा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही चोरांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. 

नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वल्समा वर्गीस (६२) या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल इंटरनॅशनल शाळेजवळील रोडवरून चर्चला प्रार्थना करण्यासाठी जात असताना त्याच वेळी समोरून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस बतावणी करून लुटले. रस्त्यातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांना अडवून आम्ही पोलीस असून पुढे रस्त्यावर एकाचा खून झाला असून तपास सुरू आहे. म्हणून तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून ते तुमच्या पर्समध्ये ठेवा. नाहीतर या कागदात बांधून देतो असे बोलून हातचलाखीने दगड असलेल्या कागदाची पुडी पिशवीमध्ये टाकून वल्समा त्यांच्या गळ्यातील ६४ हजार रु पये किमतीचे १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पळून गेले आहेत.

Web Title: nalasopara Crime news