शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, संशयित महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 7:12 PM

Murder : शब्बीर हा एका महिलेसाेबत भिसणी जंगलात आला. त्याने दुचाकी रस्त्यावरच उभी ठेवली हाेती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेले अज्ञात मारेकरी घटनास्थळी पाेहाेचले असावे, त्यांची घटनास्थळावर झटापट झाली.

ठळक मुद्देशब्बीर जुम्मा लालणवाले (२८) रा. जामडाेह असे मृताचे नाव आहे. त्याचा अनैतिक संबधातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

यवतमाळ :   शहरालगतच्या भिसणी जंगलात मंगळवारी दुपारी एका युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. यानंतर शहर पाेलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता ही खूनाची घटना असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानने युवकाच्या दुचाकीपर्यंतचा माग दाखविला. घटनास्थळावरिल परिस्थितीवरून पट्टाने गळा आवळून खून केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाेलिसांनी या प्रकरणी एका संशयीत महिलेला ताब्यात घेतले आहे. शब्बीर जुम्मा लालणवाले (२८) रा. जामडाेह असे मृताचे नाव आहे. त्याचा अनैतिक संबधातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

 

शब्बीर हा एका महिलेसाेबत भिसणी जंगलात आला. त्याने दुचाकी रस्त्यावरच उभी ठेवली हाेती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेले अज्ञात मारेकरी घटनास्थळी पाेहाेचले असावे, त्यांची घटनास्थळावर झटापट झाली. यात महिलेच्या हातातील बांगड्या फुटल्या त्या घटनास्थळावर पडून आहे. शब्बीर कमर पट्टाने गळा आवळून ठार केले. ताे पट्टाही घटनास्थळावर आहे. खून झालेले ठिकाण ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या हद्दित येत असल्याने या प्रकरणी ग्रामीणी पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू हाेती. या गुन्ह्याशी संबंधीत महिलेला संशयावरू शहर पाेलिसांनी ताब्यात घेतले. शहर ठाणेदार धनंजय सायरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले हाेते. श्वानाने खूनाच्या स्थळापासून दुचाकीच्या रस्त्यापर्यंतचा मार्ग दाखविला, नंतर श्वान जागेवर घुटमळले. लवकर या गुन्ह्यातील आराेपींचा शाेध लागले अशी शक्यात पाेलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :MurderखूनYavatmalयवतमाळPoliceपोलिसWomenमहिला