शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दारु पिण्याच्या पैशाच्या वादातून हत्या; पोलिसांनी अवघ्या १२ तासात लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 17:23 IST

Murder Case : या प्रकरणी आकाश किसन पळस (२०), रा. कसबे चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, सनि धनु सोनकर (२३), रा. पाटील चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, फैजल फयाज खान (२४)  रा. हिंदवासनी चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व यांना अटक करण्यात आले आहे.

ठाणे : खारेगाव रेल्वे फाटकाजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार अवघ्या १२ तासात कळवा पोलिसांनी या हत्येप्रकरणतील तीघा आरोपींना अटक केली आहे. केवळ दारु पिण्याच्या पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी आकाश किसन पळस (२०), रा. कसबे चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, सनि धनु सोनकर (२३), रा. पाटील चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, फैजल फयाज खान (२४)  रा. हिंदवासनी चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व यांना अटक करण्यात आले आहे. ३ डिसेंम्बर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास नियंत्नण कक्ष ठाणे येथे एका दक्ष नागरिकाने फोन करून एक जण खारेगाव फाटक जवळ जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानुसार कळवा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी अनोळखी इसमास काही अज्ञात जणांनी मारहाण करून जिवे ठार मारले असल्याचे समोर आले. या प्रकरणी अज्ञात मारेक:यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील अनोळखी मयत इसम व अज्ञात आरोपीत यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात येऊन प्रथम या मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी अवघ्या काही तासात मयत व्यक्तीची ओळख शोधून काढली. मयत व्यक्तीचे नाव गुलाब सलामत शेख (२२), रा. श्रीकृष्ण चाळ, इंदिरानगर, दुर्गा माता मंदिराजवळ, कळवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सखोलपणो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे विचारणा करु न आरोपीतांचे वर्णन प्राप्त करून आरोपीतांची नावे निष्पन्न केली. तसेच तांत्नीक माहितीच्या आधारे तिघा मारेक:यांना अवघ्या १२ तासात अटक केली. आरोपींकडे सखोल तपास केला असता, आरोपी व मयत इसम यांच्यात दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून वादावादी होवुन त्यांनी मयत इसमास लोखंडी पाईपने मारहाण करून जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. तिघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूthaneठाणे