शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डोंबिवलीत विवाहितेची हत्या; कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:32 AM

लोढा हेवन परिसरातील भवानी चौकात राजेश हा १० वर्षांपासून भाडेतत्त्वावर रेशनिंग दुकान चालवितो. रविवारी रात्रीच्या सुमारास राजेश, त्याची पत्नी श्वेता आणि नोकर गुडीकुमार असे तिघे दारू पित बसले होते

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवलीत : पूर्वेतील लोढा हेवन परिसरातील रेशनिंग दुकान चालविणाऱ्या दुकानदाराची पत्नी श्वेता गुप्ता हिची हत्या झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. पती राजेश याने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयावरून दुकानातील नोकर गुडीकुमार सिंग याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

लोढा हेवन परिसरातील भवानी चौकात राजेश हा १० वर्षांपासून भाडेतत्त्वावर रेशनिंग दुकान चालवितो. रविवारी रात्रीच्या सुमारास राजेश, त्याची पत्नी श्वेता आणि नोकर गुडीकुमार असे तिघे दारू पित बसले होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने राजेश दुकानाबाहेर निघून गेला. त्यानंतर गुडीकुमारने राजेशला मोबाइलवर फोन करून तुमच्या पत्नीने स्वत:ला जखमी करून घेतल्याची माहिती दिली. 

राजेश जेव्हा घरात आला तेव्हा श्वेता ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली.  तिच्या गळ्यावर आणि पोटावर वार केलेले होते. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीदादा चौरे, सहायक पोलीस निरीक्षक  जे.डी. मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दुकानातील गुडीकुमार याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू  असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

हत्यांचे सत्र सुरूच मागील आठवड्यात २१ फेब्रुवारीच्या रात्री कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात सुवर्णा गोडे हिची परिसरातच राहणाऱ्या पवन म्हात्रे या तरुणाने हत्या केली. तर, दोन दिवसांपूर्वीच शनिवारी  कल्याण पश्चिमेतील दत्तआळी परिसरात एका ७० वर्षीय हंसाबेन ठक्कर हिची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलीस करीत असतानाचडोंबिवलीत महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे.मोबाइल चोरट्याने केली रिक्षाचालकाची हत्यालोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : पूर्वेकडील गावराईपाड्याच्या रॉकसन कंपाऊंडमध्ये सोमवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास एका इसमाने रिक्षाचालकाची चाकूने भोसकून  हत्या केल्याची घटना घडली आहे.  तुळींज पोलिसांनी रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते फरार आरोपीचा शोध घेत आहेत.          नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथील शर्मा वाडीमध्ये किशन शुक्ला (२५) हा राहत असून तो रिक्षा चालवतो. सोमवारी संध्याकाळी पावणे पाचला रिक्षा चालवत असताना आरोपीने प्रवास करण्यासाठी किशनची रिक्षा थांबवली. एकटा रिक्षाचालक असल्याने त्याला लुटण्यासाठी मोबाइल खेचल्याने आरोपीसोबत झटापट झाली. आरोपीने त्याचा पाठलाग करून त्याला जमिनीवर पाडून त्याच्याकडे असलेल्या चाकूने गळ्यावर आणि छातीत चाकू खूपसून मोबाइल घेऊन आरोपी पळाला. स्थानिक जखमीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Murderखून