शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हत्याकांड: गळा घोटल्यानं पत्नीची जीभ बाहेर आली; सासू खोलीत आल्यावर म्हणाला, बघा ना मरत पण नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 08:43 IST

मुलीच्या मृत्यूचा शोक करणाऱ्या सासूलाही क्षणात संपविले

- नरेश डोंगरेनागपूर : आलोकने गळा घोटल्यामुळे अमिषाची जीभ बाहेर आली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. तर, अंगात सैतान संचारलेला आलोक ती लवकर मरावी म्हणून वाट बघत होता. आतल्या खोलीत असलेली सासू या दोघांच्या खोलीत आली तेव्हा तो म्हणाला, बघा ना मरत पण नाही... अन् नंतर त्याने चाकूने अमिषाचा गळा चिरला...

पाचपावलीतील पाच जणांच्या हत्याकांडाचे अनेक पैलू गुलदस्त्यात आहेत. ते उलगडण्यासाठी पोलीस यंत्रणा ३६ तासांपासून काम करत आहे. पोलिसांना अमिषाचा मोबाईल सापडला असून त्यातील ऑडिओ क्लीपवरून आलोक घरी आल्यापासून दोघींच्या हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. २७ मिनिटांची ही क्लीप आहे.

अमिषाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यामुळे तो क्षुब्ध झाला होता. ‘तू मेरी नही तो किसी और की भी नही’ असे म्हणत तिला संपविण्याचा त्याने निर्णय घेतला होता. आलोक रविवारी रात्री अमिषाच्या घरी गेला. त्याची देहबोली बघून अमिषाला धोका लक्षात आला होता. 

तू आला का... ये... आता लाजतोस कशाला?

अमिषा - तू आला का... ये ... आता लाजतोस कशाला ...(दोघांचे हसणे खिदळणे.. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव... शरीरसंबंधाची तयारी.. काही वेळानंतर...)आलोक - तू माझी पोलिसांकडे तक्रार का केली...? अमिषा - म्हणजे काय, मी का तुझी (...) आहे का? मी माझ्या मनाची मालकीण आहे. तू आपले काम कर... आलोक - तू चांगली वाग... अमिषा - तू चांगला वाग, अन्यथा पुन्हा तुझी तक्रार करेन... (अमिषाचे हे वाक्य त्याच्या जिव्हारी लागते अन् तो अचानक हिंसक झाला. दोघे एकमेकांना अश्लील शिव्या देतात. तो मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतील अमिषाचा गळा घोटतो. ती आचके देत असते. तेवढ्यात त्या खोलीत अमिषाची आई लक्ष्मीबाई येते. त्यांना बघून ही मरत का नाही...असा सवाल आलोक करतो. अमिषाला संपवतो.) लक्ष्मीबाई - जावई ... तुम्ही हे काय केले... आलोक - तुम्ही ओरडू नका, लोक जागतील.. गप्प राहा... त्याचक्षणी लक्ष्मीबाईंची किंकाळी (त्याने त्यांचाही गळा कापला). 

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यूPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ