शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

मुंबईच्या डबेवाल्याची फसवणूक; लग्न झालेल्याच मुलीशी लावून दिलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 8:39 PM

Fraud Case with Mumbai's Dabbewala : गुन्हे अन्वेषण विभाग : नऊ महिलांसह दोन जणांना अटक

ठळक मुद्देयाबाबत गणेश अर्जुन सावळे (वय ३२, व्यवसाय मुंबईचे डबेवाले, रा. सध्या दिवड, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. मुलूंड काॅलनी, हनुमान पाडा) याने फिर्याद दिली.

वडगाव मावळ :  लग्न झालेल्या महिलेचे पुन्हा लग्न लावून नवरदेवाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये  नऊ महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. याबाबत गणेश अर्जुन सावळे (वय ३२, व्यवसाय मुंबईचे डबेवाले, रा. सध्या दिवड, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. मुलूंड काॅलनी, हनुमान पाडा) याने फिर्याद दिली.

Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक 

याप्रकरणी मोना नितीन साळुके (वय २८, रा. मांजरी, पुणे), दिगंबर जगन्नाथ भांबरे (वय  २९, रा.  मांजरी बुद्रुक), सोनाली ऊर्फ विद्या सतीश खंडाळे ( वय २७ , रा. पद्मावती, कात्रज, धनकवडी), ज्योती रवीेंद्र पाटील वय ३५, रा. केसनंद फाटा, वाघोली),  सतीश रंगनाथ झांबरे (वय २९  रा, धायरी ), महानंदा ताणाजी कासले (वय ३९ रा. हडपसर),  रूपाली सुभाष बनपटटे (वय ३७), कलावती सुभाष बनपट्टे (वय  २५), सारिका संजय गिरी वय  ३३, सर्व रा. वडारगल्ली, पुणे), स्वाती धर्मा साबळे (वय २४, रा. भेकराईनगर, हडपसर),  पायल गणेश साबळे (वय २८, रा. गडद, ता. खेड), माणिक लोटे व त्याचा एक सहकारी नाव पत्ता माहीत नाही, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गोळीबारात गोल्डमॅन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला, दुचाकीवरून अज्ञात मारेकरी फरार 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साबळे हा मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतो. लग्न जमवून देणारा एक जण आहे असे त्याच्या मित्राने सांगितले. त्यानंतर त्याने माणिक लवटे याच्याबरोबर संपर्क केला .खेड तालुक्यातील गडद गावी बोलवले. मुलगी दाखवली. दोन दिवसांनंतर घर पाहण्यासाठी दिवड गावी आला. मुलगी पसंत पडल्यावर मध्यस्थांनी अडीच लाखांची मागणी केली. नवरदेवाने देण्याचे कबूल केले. लग्नाची तारीख २१ जानेवारी ठरली. सोनाली ऊर्फ विद्या सतीश खंडागळे (वय २७ रा. कात्रज, पुणे) हिचे आळंदी येथे लग्न झाले. आठ दिवसांने कळाले तिला दोन मुली आहेत. शंका आल्याने नवऱ्याने मोबाईल चेक केला. त्यामध्ये तिचे संभाषण ऐकले की माझे ठरलेले पैसे द्या, मी पैसे व सोने घेऊन पळून येते. यानंतर ताजे गावचे माजी उपसरंपच नीलेश केदारी, सदस्य उमेश केदारी, महादू मालेकर, अनंता मालेकर, रोहिदास आमले यांनी मुलीला न कळता गुन्हे अन्वेषण पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फोजदार दतात्रय जगताप, उपनिरीक्षक शीला खोत, सुनीता मोरे, नंदा कदम यांनी सापळा रचून या अकरा जणांना अटक केली. पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नMumbai Dabbawalaमुंबई डबेवालेPoliceपोलिसMumbaiमुंबईPuneपुणेArrestअटकWomenमहिला