Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक 

By पूनम अपराज | Published: February 9, 2021 03:42 PM2021-02-09T15:42:43+5:302021-02-09T15:45:10+5:30

Gangster Ejaz Lakdawala Arrested : २० वर्षांपासून फरार लकडावाला मुंबईतील मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक होता आणि त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 

Video: Gangster Ejaz Lakdawala arrested for demanding Rs 2 crore ransom from milk trader | Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक 

Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक 

Next
ठळक मुद्दे२ कोटींची खंडणी मागणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जवळच्या साथीदारास ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

कल्याणमधील दूध व्यावसायिकाकडे २ कोटींची खंडणी मागणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जवळच्या साथीदारास ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. इजाज लकडावाला असं या आरोपीचे नाव आहे. डॉन छोटा राजनचा जवळचा साथीदार इजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहारची राजधानी पाटणा येथून जानेवारी २०२० मध्ये अटक केली होती. 

२०२० साली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली त्यावेळी लकडावालाने नेपाळ मार्गे पाटणा गाठले. येथे जक्कनपूर पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी त्याला अटक होती. २० वर्षांपासून फरार लकडावाला मुंबईतील मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक होता आणि त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड इकबाल मिरची आणि छोटा राजनचा हस्तक असलेल्या एजाज लकडावालाने १९९३ ते १९९५ दरम्यान जोगेश्वरी परिसरात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारावर गोळीबार केला होता.    

बिहार एसटीएफच्या सहकार्याने त्यावेळी  पाटणा येथे लकडावाला अटक केली होती. लकडावालावर खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहे. खंडणी आणि  इतर देशद्रोही खटल्यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी लकडावालाच्या मुलीला अटक केली होती. एजाजच्या मुलीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना बरीच माहिती हाती लागली होती. यावेळी माहिती मिळाली की इजाज लकडावा ८ जानेवारी रोजी पाटण्यात येणार आहे. यानंतर पाटणा पोलिसांच्या मदतीने एजाजला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या अटकेपासून दूर राहण्यासाठी लकडावाला अमेरिका, मलेशिया, यूके, नेपाळ येथेही वास्तव्याला आहे.

 

Web Title: Video: Gangster Ejaz Lakdawala arrested for demanding Rs 2 crore ransom from milk trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.