शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 06:27 IST

महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : लोकसभा निवडणुकीत इकबाल मुसा स्फोटातील आरोपी विरोधकांचा प्रचार करतोय. भारतात उद्धवसेनेने सत्ता मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा घालविली असून आपल्याकडे पाकिस्तानचे झेंडे फडकवलेले चालतील का?  याचे उत्तर उद्धवसेनेने द्यावे. बाळासाहेब ठाकरे  यांचा तिरस्कार आयुष्यभर ज्यांनी केला त्यांनाच त्यांनी (उद्धव ठाकरे) मांडीवर घेतले  आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.

महायुतीचे उमेदवार हेमंत गाेडसे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी बाइक  रॅली काढण्यात आली.  त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विजयाची रॅली आम्ही आज काढली. महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोलाही एकनाथ  शिंदे यांनी उद्धव  ठाकरे यांना नाव न घेता लगावला. 

प्रामाणिकपणे प्रचार करा, मोदींचे कार्य आहेच

आराम करतो, नाश्ता करतो, असे करू नका. अहोरात्र प्रामाणिकपणे प्रचाराचे काम करा, ७० टक्क्यांहून अधिक मतदान व्हायलाच हवे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांत या देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी जे-जे काम केले ते सर्व आपल्याला कामी येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना