गोळीबारात गोल्डमॅन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला, दुचाकीवरून अज्ञात मारेकरी फरार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:15 PM2021-02-09T17:15:39+5:302021-02-09T17:18:13+5:30

Firing : डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली पडला. घटनेनंतर मारेकरी दुचाकीने वेगाने फरार झाले.

The Goldman in the shooting bled to death, the unidentified killer fleeing from the bike | गोळीबारात गोल्डमॅन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला, दुचाकीवरून अज्ञात मारेकरी फरार 

गोळीबारात गोल्डमॅन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला, दुचाकीवरून अज्ञात मारेकरी फरार 

googlenewsNext
ठळक मुद्देशिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. त्याच्या वर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास जखमी अवस्थेत रुबी हाॅस्पिटलला दाखल केले गेले. पण उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालया समोरील रस्त्यावर एटीएमसमोर मारेकऱ्याने केलेल्या हल्यात सचिन नानासाहेब  शिंदे ( वय २९ वर्ष) रा. लोणीकंद, ता.हवेली जागीच ठार झाला. आज सकाळी ११ः३० च्या सुमारास सचिन शिंदे ग्रामपंचायत कार्यालयातून काम करुन बाहेर आल्यानंतर एटीएमसमोर सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या लोकांनी गोळीबार केला. डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली पडला. घटनेनंतर मारेकरी दुचाकीने वेगाने फरार झाले.

शिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. त्याच्या वर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास जखमी अवस्थेत रुबी हाॅस्पिटलला दाखल केले गेले. पण उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.लोणीकंदमध्ये ही घटना घडल्या नंतर तणावाचे वातावरण आहे. लोणीकंद पोलीस निरिक्षक प्रताप मानकर पुढील तपास करीत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. शिंदे हा गुन्हेगारी प्रवृतीचा होता आणि गोल्डमॅन म्हणूनही ओळखला जात होता.



लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. अतिरिक्त एस.  पी. विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सुचना दिल्या.

Web Title: The Goldman in the shooting bled to death, the unidentified killer fleeing from the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.