शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 07:51 IST

Rohit Arya : पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं ऑडिशन असल्याचं सांगून एक धक्कादायक घटना घडली.

मुंबईतील पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं ऑडिशन असल्याचं सांगून एक धक्कादायक घटना घडली. एका साध्या कास्टिंग कॉलपासून सुरू झालेल्या घटनेने पुढे ३५ मिनिटांत वेगळंच वळण घेतलं. मुंबईपोलिसांच्या क्विक रिअ‍ॅक्शन टीमने १७ लहान मुलं, एका वृद्धाला आणि एका महिलेला तातडीने वाचवलं. ३८ वर्षीय रोहित आर्या पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

आठ जणांची कमांडो टीम बाथरूममधून आतमध्ये घुसली आणि हल्ला केला, कमांडरने सुरुवातीला रोहित आर्याशी बोलून परिस्थिती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने बंदूक आणि केमिकल्स दाखून जवळ आलात तर गोळीबार करण्याची आणि जाळून टाकण्याची धमकी दिली. जेव्हा त्याने गोळीबार केला तेव्हा पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात तो जखमी झाला.

एअर गन, केमिकल्स, लायटर जप्त

ऑडिशन रूममध्ये गोंधळ उडाला. मुलं भीतीमुळे कोपऱ्यात लपून बसली होती. कमांडो टीम हळूहळू पुढे गेली आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. वैद्यकीय तपासणीनंतर, त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. फॉरेन्सिक टीमने एक एअर गन, काही केमिकल्स आणि एक लायटर जप्त केलं. अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी मोठा स्फोट किंवा जाळपोळ करण्याचा प्लॅन करत होता. सर्व पुरावे आता चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मुलांना ओलीस ठेवलं, स्टुडीओ जाळण्याची धमकी

पवई पोलिसांना दुपारी २ वाजताच्या सुमारास फोन आला की, एका व्यक्तीने आर स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवलं आहे आणि तो स्टुडीओ जाळण्याची धमकी देत ​​आहे. पोलिसांनी ताबडतोब परिसराला घेराव घातला आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, आर्या एक लाईव्ह व्हिडीओ काढत होता, तो दावा करत होता की, त्याच्या मागण्या पैशासाठी नाहीत तर "नैतिक आणि न्यायाशी संबंधित" आहेत.

आरोपी मानसिक तणावाखाली

घटनेनंतर जप्त झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित आर्या म्हणाला, "मी दहशतवादी नाही, मला पैसे नकोत. मला फक्त काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. पण जर कोणी चूक केली तर मी हे सर्व जाळून टाकेन." पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहित आर्य आर स्टुडिओमध्ये काम करत होता आणि एक यूट्यूब चॅनेल देखील चालवत होता. तो अनेक दिवसांपासून मुलांना चित्रपट ऑडिशन्ससाठी आमिष दाखवत होता. मानसिक तणावामुळे त्याने हे धोकादायक पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे.

उपचारांदरम्यान मृत्यू, तपास सुरू

रोहित आर्याला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने असे लहान मुलांना ओलीस ठेवण्याचे भयंकर कृत्य का केले हे शोधण्यासाठी पोलीस आता त्याचे व्हिडीओ, सोशल मीडिया आणि मागील रेकॉर्ड तपासत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Dramatic Rescue: Commandos Save 17 Children from Studio Hostage

Web Summary : Mumbai police rescued 17 children, a woman, and an elderly man from a studio hostage situation. The captor, Rohit Arya, died after being shot by police following threats of violence and arson. He held them hostage under the guise of movie auditions.
टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिस