शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीराईटशिवाय दाखवले अभिताभचे चित्रपट, मुंबई पोलिसांची या चॅनेलवर केली मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 20:26 IST

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्यादरम्यान कॉपीराईट शिवाय अभिताभ बच्चन यांचे चित्रपट दाखवल्या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंबई -  कॉपीराईटशिवाय अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपट दाखवल्याप्रकरणी आज मुंबईपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महामुव्ही नावाच्या चॅनेलवर ही कारवाई केली असून, महामुव्ही चॅनेलचा सर्व्हर आणि कंटेंट सील केले आहे.  दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महामुव्हीजच्या सीईओंना अटक केली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने ३६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र काही दिवसांपूर्वी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले होते. रिपब्लिक टीव्हीचे अधिकारी विकास खानचंदानी आणि बार्कचे माजी अधिकारी रोमिल रामगडीया, माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या अधिकारी प्रिया मुखर्जी, शिवेंदू मुळेलकर, रॉबर्ट वॉल्टर आणि शिव सुंदरम् हे फरार आरोपी असल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.

काही वाहिन्या जाहिरातींद्वारे महसूल मिळविण्यासाठी टीआरपी वाढवून दाखवत असल्याची तक्रार बीएआरसी म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलिंग (बार्क)ने पोलीस ठाण्यात केली होती. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा सहभागी असल्याचे नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाMumbaiमुंबईPoliceपोलिस