शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मुलगी झाली म्हणून नवजात अर्भकाला आईने फेकले १७ व्या मजल्यावरून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 22:38 IST

अधिक तपास कांदिवली पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देकांदिवली पश्चिम येथे १७ व्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या महिलेची आजच गुरुवारी दुपारी प्रसूती घरीच झाली. आईला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई - पूर्वीच दोन मुली जन्माला आल्या त्यात तिसरीही मुलगी जन्माला येताच आईनेच इमारतीच्या १७ व्या माळ्यावरून नवजात अर्भकाला फेकून दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करून पतीला अटक करण्यात आली. तर आईला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास कांदिवली पोलीस करीत आहेत.गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने नवजात अर्भक खाली फेकल्याच्या घटनेचा उलगडा झाला. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय भारत एसआरए सोसायटी अभिलाख नगर, कांदिवली पश्चिम येथे १७ व्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या महिलेची आजच गुरुवारी दुपारी प्रसूती घरीच झाली. मात्र, मुलगीच जन्माला आलेली पाहून महिलेने बाथरूमची काच काढून इमारतीच्या खाली नवजात अर्भक फेकले. ते जमिनीवर पडताच आवाज झाला. हा आवाज इमारतीच्या सुरक्षारक्षकाने एकाला आणि तपासणी केल्यानंतर इमारतीतून नवजात अर्भक खाली फेकल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. घटनास्थळी त्वरित ठाणे अंमलदार संदीप पाटील पोहचले. त्यांनी अर्भकाला पंचनामा करून ताब्यात घेतले. त्याच्या शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, नवजात अर्भक कुठल्या माळ्यावरून खाली टाकले याबाबत पोलीस संभ्रमात होते. त्यानुसार पोलिसांनी सोबत आलेल्या महिला पोलिसांना घेऊन इमारतीचा प्रत्येक मजला तपासण्याचे ठरविले आणि तपास सुरु केला. जय भारत एसआरए सोसायटीची बी विंग ही २३ मजल्याची इमारत आहे. पोलीस पथकाने मोठी कसरत करीत प्रत्येक मजला तपासात १७ व्या माळ्यावर आल्यानंतर महिला पोलिसांनी घराची तपासणी केल्यानंतर रक्ताचे काही ठिकाणी डाग आढळले. या महिलेकडे विचारणा केल्यानंतर तिने अर्भकाला खाली फेकल्याची कबुली दिली. पती तिला खर्चासाठी पैसे देत नव्हता. अगोदरच दोन मुली आहेत. त्यात तिसरीही मुलगीच झाल्याने तिला जन्मताच खाली फेकून दिल्याची कबुली दिली. घरीच प्रसूती झाल्याने अस्वस्थ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कांदिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई