फार्म हाऊसवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 04:54 IST2019-12-16T04:54:24+5:302019-12-16T04:54:37+5:30

कोपरगावपासून जवळ असलेल्या एका गावात चौथीत शिक्षक असलेल्या एका मजूर कुटुंबातील मुलीवर हा प्रसंग ओढावला आहे़

Minor girl abused at farm house | फार्म हाऊसवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फार्म हाऊसवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर/कोपरगाव : विकृत नराधमाने कोपरगाव परिसरातील नऊ वर्षांच्या मुलीचे एकप्रकारे अपहरण करत फार्म हाऊसवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे़ पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिसांनी अमोल निमसे (रा़ शिरापूर ता़ पाथर्डी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे़

कोपरगावपासून जवळ असलेल्या एका गावात चौथीत शिक्षक असलेल्या एका मजूर कुटुंबातील मुलीवर हा प्रसंग ओढावला आहे़ पीडित मुलगी शुक्रवारी सायंकाळी शाळेतून घरी येत असताना आरोपीने तिला मोटारसायकलवर बसवून कोपरगाव परिसरातील एका फार्म हाऊसवर नेले़ तेथे तिच्यावर अत्याचार केला़ दुसऱ्या दिवशी शनिवारी मुलीला आरोपीने तिच्या गावापासून जवळच असलेल्या ठिकाणी सोडून दिले. मुलगी वेळेत घरी न आल्याने नातेवाईकांनी शाळेत येऊन चौकशी केली़ याबाबत कोपरगाव पोलिसांनाही माहिती देण्यात आली़

Web Title: Minor girl abused at farm house