मथुरा मर्डर मिस्ट्री! भिंतीवर नोट, फोनमध्ये शेवटचा व्हिडीओ, ५ मृतदेह; थरकाप उडवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:22 IST2026-02-11T18:21:15+5:302026-02-11T18:22:23+5:30

मनीष मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ आणि नैराश्यात होता.

mathura man kills wife and three children before end life due to mental depression | मथुरा मर्डर मिस्ट्री! भिंतीवर नोट, फोनमध्ये शेवटचा व्हिडीओ, ५ मृतदेह; थरकाप उडवणारा खुलासा

फोटो - आजतक

मथुरेतील महावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खप्परपूर गावात मनीष नावाच्या तरुणाने आपली पत्नी सीमा आणि पंकज, प्रियांशी व हनी या तीन मुलांची गळा दाबून हत्या केली. संपूर्ण कुटुंबाचा अंत केल्यानंतर मनीषने स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाइड नोट आणि मनीषने रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ जप्त केला आहे. एसएसपी श्लोक कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून प्राथमिक तपासात ही घटना नैराश्यातून घडल्याचं समोर येत आहे.

सुरुवातीला संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा होती, मात्र पोस्टमार्टम रिपोर्टने या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं. मनीषने आधी पत्नी आणि तीन निष्पाप मुलांचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतःला संपवलं, हे रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. मनीषला हे भयंकर पाऊल उचलण्यास नेमक्या कोणत्या कारणांनी प्रवृत्त केलं, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हे आत्मघातकी पाऊल उचलण्यापूर्वी मनीषने घराच्या भिंतीवर सुसाइड नोट लिहिली होती आणि एक व्हिडीओही बनवला होता. सुसाइड नोटमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ आणि नैराश्यात होता. जिल्हाधिकारी सीपी सिंह यांनी ही घटना अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबाला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आग्रा विभागाचे आयुक्त नागेंद्र प्रताप, डीआयजी शैलेश कुमार पांडे, जिल्हाधिकारी आणि एसएसपी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा गावात दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून कुटुंबात नेमकं काय सुरू होतं हे जाणून घेण्यासाठी मृताचा पुतण्या आणि आसपासच्या लोकांची चौकशी केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उ़डाली आहे. 

Web Title : मथुरा हत्याकांड: दीवार पर नोट, वीडियो, 5 की मौत, सनसनीखेज खुलासा

Web Summary : मथुरा में एक व्यक्ति ने पत्नी और तीन बच्चों की हत्या कर आत्महत्या कर ली। नोट और वीडियो से पता चला कि निराशा के कारण यह भयानक कृत्य हुआ। पुलिस पारिवारिक त्रासदी के पीछे के मकसद की जांच कर रही है। सरकार ने सहायता की पेशकश की है।

Web Title : Mathura Murder Mystery: Note on Wall, Video, 5 Dead

Web Summary : In Mathura, a man killed his wife and three children before committing suicide. A note and video reveal despair led to the horrific act. Police are investigating the motive behind the family tragedy. The government has offered aid.