शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे विधानसभेत पडसाद; विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 05:06 IST

अंबानींच्या बंगल्याजवळ सापडलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन कालपासून बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आणि थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याची बातमी त्यांनी सभागृहाला दिली तेव्हा सभागृह अवाक् झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ स्फोटकांसह कार सापडल्याचे प्रकरण, त्यातच मनसुख हिरेन यांचा मृत्यू या सर्वच प्रकरणाची चौकशी दहशतवादविरोधी पथकामार्फत (एटीएस) करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली. तत्पूर्वी या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले.    अंबानींच्या बंगल्याजवळ सापडलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन कालपासून बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आणि थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याची बातमी त्यांनी सभागृहाला दिली तेव्हा सभागृह अवाक् झाले. फडणवीस यांनी हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणी केली. या घटनेत हिरेन हे घटनेचे साक्षीदार होते पण त्यांचे संरक्षण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असा आरोप त्यांनी केला. एका अतिरेकी संघटनेने ही स्फोटके ठेवल्याचा दावा केला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. अनिल देशमुख यांनी एनआयए चौकशीची मागणी फेटाळली. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर विरोधी पक्षनेते उगाच संशय घेत आहेत. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडून २४ तासही होत नाही तोच एनआयए चौकशीची मागणी करणे योग्य नाही असे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले.सचिन वाझे यांचे नाव विरोधकांकडून का घेतले जात आहे? रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना त्यांनी अटक केली म्हणून का असा सवाल अनिल देशमुख यांनी केल्यानंतर विरोधक संतप्त झाले. वाझेंना आम्ही घाबरत नाही असे फडणवीस व सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

सचिन वाझेंशी हिरेनचे मोबाइलवर बोलणे झाले?मनसुख हिरेन यांचे घटनेच्या आधी वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी मोबाइलवर संवाद झाला होता का, अशी शंका फडणवीस यांनी उपस्थित केली. दोघेही ठाण्यात राहतात. वाझे यांच्या नावे नोंद असलेल्या मोबाइलवर हिरेन यांचा अनेकदा संवाद झाला होता असा दावा फडणवीस यांनी केला. मनसुखने त्याची कार नादुरुस्त झाल्याचे म्हटले होते. घटनेच्या दिवशी तो मुंबई पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये कोणाला भेटायला गेला होता असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस