शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: तुर्भे येथे शिवसेनेच्या शाखेची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 14:44 IST

लवकरच शिवसैनिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

ठळक मुद्देअद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाहीआज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना राजकीय पक्षांनी मतदाराला घराबाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच राजकीय द्वेषातून तुर्भे स्टोअर येथील शिवसेनेच्या शाखेची तोडफोड करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी शिवसैनिक शाखेच्या ठिकाणी गेले असता ही बाब निदर्शनास आली. 

तुर्भे स्टोअर येथील शिवसेना शाखेत तोडफोड झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र, आपसातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. शहरात विधानसभा निवडणुकीची रंगत चढत असतानाच सोमवारी मतदानाच्या दिवशी सकाळी हा प्रकार उघड झाला. यामुळे राजकीय दृष्टिकोनातून या प्रकाराकडे पाहिले जात होते. या प्रकाराची चर्चा परिसरात पसरताच तणाव निर्माण झाला होता. मात्र, कार्यकत्र्याच्या आपसातील वादातून हा प्रकार घडला असल्याने संबंधितांनी तक्रार केलेली नसल्याचे तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. सोमवारी सकाळी काही शिवसैनिक तिथल्या शाखेकडे गेले असता, आतमधील टेबल, खुर्ची तसेच टीव्ही फुटल्याचे आढळून आले. या प्रकरणी चौकशीदरम्यान रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी काही कार्यकर्ते बसलेले होते. त्यांच्यात आपसात वाद झाला असता धक्काबुक्कीमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस