शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:31 IST

आसनसोलमधील कुल्टी विधानसभा मतदारसंघातील लखियाबाद अप्पर पारा येथील लॉटरी विजेता कार्तिक बाउरीच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

पश्चिम बंगालच्या आसनसोलमधील कुल्टी विधानसभा मतदारसंघातील लखियाबाद अप्पर पारा येथील लॉटरी विजेता कार्तिक बाउरीच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तृणमूल बोडोचे माजी अध्यक्ष बेबी बाउरी यांच्या घराबाहेरील पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्यात कार्तिकचा मृतदेह आढळून आला. त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने आसनसोल जिल्हा रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मृत्यूची बातमी पसरताच परिसरात एकच गोंधळ उडाला. मृताची आई सबिता बाउरी यांनी बेबी बाउरी, अमरदीप बाउरी, संदीप बाउरी आणि ज्योत्स्ना बाउरी यांच्यावर हत्येचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की अमरदीपने कार्तिकला त्याच्या घरी बोलावलं होतं आणि तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. कुटुंबीय त्याला शोधण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कार्तिकचा किंचाळण्याचा आवाज आला आणि काही वेळातच तो रक्ताच्या थारोळ्याता पायऱ्यांवर पडलेला आढळला.

स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात जमा झाल्यावर बेबी बाउरीने दावा केला की, कार्तिक चोरी करण्याच्या उद्देशाने घरामध्ये घुसला होता. पळून जाताना तो भिंतीवरून खाली पडला. पण कार्तिकच्या आईने हा दावा फेटाळून लावला. तिने सांगितलं की, तिच्या मुलाला नुकतीच १ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे, त्यामुळे चोरीचा आरोप निराधार आहे. आईने ही पूर्वनियोजित हत्या असल्याचं म्हटलं.

सबिता बाउरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बुधवारी पोलिसांनी बेबी बाउरी आणि अमरदीप बाउरी यांना अटक केली, तर संदीप आणि ज्योत्स्ना बाउरी अद्याप फरार आहेत. लवकरच दोघांनाही अटक करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

English
हिंदी सारांश
Web Title : Lottery Winner Found Dead in Pool of Blood; Foul Play Suspected

Web Summary : Lottery winner Kartik Bauri found dead in Asansol. Family alleges murder by neighbors over lottery money. Police arrested two, investigation underway.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक