Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:18 IST2022-06-12T13:14:01+5:302022-06-12T14:18:56+5:30
Lawrence BIshnoi : सध्या माजी आमदार परवेझ अली यांनी अमरोहा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी
उत्तर प्रदेशच्या अमरोहा विधानसभेतून 5 वेळा आमदार राहिलेले मेहबूब अली आणि त्यांचा मुलगा परवेझ अली यांना लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. सध्या माजी आमदार परवेझ अली यांनी अमरोहा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक करणार असल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा नगरचे आमदार मेहबूब अली आणि त्यांचा मुलगा माजी आमदार परवेझ अली यांना अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी माजी आमदार परवेझ अली यांनी अमरोहा कोतवाली येथे तक्रार केली. पोलिसांनी तत्परता दाखवत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याचा दावा पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे फोनवर धमकी देणारा व्यक्ती स्वत: लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
धमकी देणाऱ्याला लवकरच पकडण्याचा दावा पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपा नेत्याला व्हॉट्सअॅप ग्रुपवर अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. माजी आमदार परवेझ अली यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला होता. तो कॉल रिसिव्ह करू शकला नाही, तर त्याच नंबरवरून त्याला व्हॉट्सअॅपवर धमकी आली. त्यानंतर पुन्हा फोन करून धमकी देण्यात आली.