पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:17 IST2025-12-26T06:17:15+5:302025-12-26T06:17:52+5:30
दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा शुक्रवारी होणार होती.

पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा आता येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा शुक्रवारी होणार होती.
दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेले नाही. अंतिम निर्णय झाल्यानंतर अटी व शर्तींवर विचार होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने मागितल्या ४० जागा : पुण्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने ३० ते ४० पेक्षा जास्त तर पिंपरी-चिंचवडमध्ये २५ ते ३० जागा मागितल्या आहेत. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत आहोत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.