शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील दोन चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी केले गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 15:07 IST

Robbers Arrested in Bhiwandi : ४४ लाखांचा मुद्देमाला जप्त; तीन गुन्ह्यांची झाली उकल

ठळक मुद्देतपासात कोनगाव पोलीस ठाण्यासह भिवंडी तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत झालेली घरफोडी अशा तीन घरफोडी उघडकीस आणून त्यांच्या जवळून ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. ३ ) भिवंडी शहरा नजीकच्या सरवली व सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील अत्याधुनिक यंत्रमाग कारखाने असून या ठिकाणी रेकी करून बंद असलेल्या अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात घरफोडी करून तेथील मधील महागडे संगणकीय कार्ड चोरी करणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे. तपासात कोनगाव पोलीस ठाण्यासह भिवंडी तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत झालेली घरफोडी अशा तीन घरफोडी उघडकीस आणून त्यांच्या जवळून ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोनगाव पोलीसांनी भिवंडी पोलीस संकुल येथे बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

          

कोनगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील सपना इंडस्ट्रीयल इस्टेट सरवली येथील कपिल रेयॉन इंडिया या यंत्रमाग कारखान्याचे शटर उचकटून तेथील एअरजेट पिकानॉल सुमम लूम मशीन मधील १८ लाख रुपये किमतीचे ७२ इलेक्ट्रिक कार्ड चोरी केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्या पूर्वी त्याच परिसरात ४ फेब्रुवारी रोजी के जी सिल्क मिल्स टेक्स्टाईल्स कंपनी मध्ये घरफोडी करून २४ लाख रुपयांचे १२० इलेक्ट्रिक कार्ड चोरी केल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल होते . घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण ,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षसक गसंपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित पाटील, किरण वाघ,पो उप नि.पराग भाट, पोलीस कर्मचारी वामन सूर्यवंशी,राजेश शिंदे,संतोष मोरे,संतोष पवार,विनायक मासरे, नरेंद्र पाटील,गणेश चोरगे,कृष्णा महाले, अविनाश पाटील,अशोक ढवळे,विजय ताठे यांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या मदतीने कमलेश माताप्रसाद मिश्रा व जितेंद्र उमा महतो मूळ रा.उत्तरप्रदेश या दोघा संशयितांना दिवा ठाणे येथून ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल दोन्ही गुन्हे केल्याची कबूली त्यांनी दिली असतांनाच त्यांच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अरटेज फब्स लि. सोनाळे येथील कंपनीतील ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ५३ इलेक्ट्रिक कार्ड घरफोडी गुन्ह्याची उकल करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे . त्या सोबत अटक केलेल्या जितेंद्र उमा महतो या आरोपी विरोधात गुजरात राज्यात तीन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये तो फरार आहे . या कामगिरी मुळे घरफोडीच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले असून सदर या दोन्ही आरोपींना ८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे करीत आहेत .

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकbhiwandiभिवंडीPoliceपोलिस