शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशाच्या पत्नीचा चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमध्ये मृत्यू; मोबाईल ट्रेस करून ट्रेन रोखली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:14 IST

ही ट्रेन मंदसौर स्टेशनला थांबवून तपास करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे पोलीस आणि कर्मचारी ट्रेनमधील डब्यांची चौकशी करत होते. तिथेही उषा चौहान यांचा शोध लागला नाही.

रतलाम - मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमध्ये एका न्यायाधीशाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पत्नीची वाट पाहत स्टेशनवर थांबलेल्या पतीला त्यांची पत्नी ट्रेनमध्ये मृत्यूशी संघर्ष करतेय हे माहितीही नव्हते. कांचीगुडा-भगतच्या कोठी एक्सप्रेसमधील हा प्रकार आहे. जिथे प्रवासावेळी अचानक महिलेची तब्येत बिघडली आणि सायलेंट हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला. या घटनेची रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन चौकशी करत आहे. 

माहितीनुसार, राजस्थानच्या निंबाहेडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजकुमार चौहान पत्नी उषा चौहान यांच्यासह जोधपूरहून निंबाहेडा येथे परतत होते. हे दोघेही ट्रेनमध्ये चढले परंतु त्यांची जागा वेगवेगळ्या कोचमध्ये होती. त्यामुळे हा प्रवास दोघांनी वेगवेगळ्या डब्यातून केला. प्रवास सुरू होता. वाटेत दोघांचे फोनवरून बोलणेही झाले. निंबाहेडा स्टेशनला पोहचण्यापूर्वी उषा चौहान यांनी पतीला फोन केला आणि वॉशरूमला जातेय असं सांगितले. मात्र या फोनवरील संवाद अखेरचा ठरेल हे कुणालाही वाटले नसेल.

पती स्टेशनवर वाट पाहत बसले, मग...

काही वेळानंतर ट्रेन निंबाहेडा स्टेशनला पोहचली. ट्रेन थांबल्यानंतर न्यायाधीश राजकुमार चौहान डब्यातून खाली उतरून पत्नीची वाट पाहू लागले. पत्नीही कोचमधून खाली उतरून प्लॅटफॉर्मवर येईल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु काही मिनिटे वाट पाहूनही पत्नी उषा दिसली नाही. कदाचित ती दुसऱ्या दरवाजाने उतरली असेल किंवा सामान घेण्यास उशीर होत असावा असं त्यांना वाटत राहिले. मात्र जेव्हा खूप वेळ झाला आणि पत्नी दिसत नव्हती तेव्हा त्यांची चिंता वाढली. राजकुमार यांनी पत्नीला शोधण्याचा प्रयत्न केला. प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांनाही विचारले तरीही कुणाकडे काही माहिती मिळाली नाही. ट्रेन रवाना झाली, पत्नी अचानक बेपत्ता झाल्याने तातडीने जजने रेल्वे पोलिसांना सूचना केली. सूचना मिळताच पोलिस सक्रीय झाले. त्यांनी माहिती गोळा करत पुढील स्टेशनला अलर्ट केले. 

ही ट्रेन मंदसौर स्टेशनला थांबवून तपास करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे पोलीस आणि कर्मचारी ट्रेनमधील डब्यांची चौकशी करत होते. तिथेही उषा चौहान यांचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी महिलेचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. हे लोकेशन ट्रेनमध्येच होते. त्याआधारे पोलिसांनी जावरा स्टेशनला ट्रेन पुन्हा थांबवली. तिथे उषा चौहान प्रवास करत असलेल्या आरक्षित डब्यात तपास सुरू केला. त्यावेळी टॉयलेटचा दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले. खूप वेळ दरवाजा ठोकूनही आतून काही प्रतिसाद आला नाही त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दरवाजा तोडून आतील दृश्य पाहताच पोलिसांना धक्का बसला. उषा चौहान बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार या महिलेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Judge's Wife Dies in Train Toilet; Mobile Tracing Halts Train

Web Summary : A judge's wife died of a heart attack in a train toilet. Her husband, waiting at the station, alerted police when she didn't appear. The train was stopped, and she was found unconscious but declared dead at the hospital.
टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी