शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर भावासह मामाकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 07:35 IST

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, हे अत्याचार ओळखीतील लोकांकडूनच केले जात असल्याचे समोर आले आहे. 

नालासोपारा : वसई पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोठा मामा आणि सख्ख्या भावानेच पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने बुधवारी वसई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आपला भाऊ आणि मामासोबत राहते. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये तिच्या १८ वर्षीय भावाने जबरदस्ती करून व धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले. 

जवळच्या व्यक्तींकडून विश्वासघातपीडित मुलीचे हातपाय व तोंड ओढणीने व रुमालाने बांधून मामाला काहीही सांगू नको, नाहीतर तुला मारीन, अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर मुलीच्या मोठ्या मामाने ती घरामध्ये झोपलेली असताना तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडू नको, नाहीतर मारीन, अशी धमकी देत शारीरिक संबंध केले. ती गर्भवती राहिल्याचे मामाला समजल्यानंतर तिला मुंबईत नेऊन तिचा गर्भपात केला. वसई पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, हे अत्याचार ओळखीतील लोकांकडूनच केले जात असल्याचे समोर आले आहे.