शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

'तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा', एकतर्फी प्रेमातून तरुणाने कापले तरुणीचे ओठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:14 IST

Crime News : या हल्ल्याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने साथीदाराच्या मदतीने चाकूने तरुणीचे ओठ कापल्याची घटना उघड झाली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या हल्ल्याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्तार अब्दुल रहीम अंसारी (२३) व शाहीद अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. मुक्तार याचे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. एक वर्षांपासून मुक्तार हा पीडित तरुणीला त्रास देत होता. मात्र मुलीचा या प्रेमाला विरोध होता. ही मुलगी आपल्या प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने मुलीस अनेकदा धमक्याही दिल्या होत्या.
नऊ एप्रिलला पीडित तरुणी सकाळी घराबाहेर पडली असता मुक्तार व त्याच्या साथीदाराने तिला गाठले. त्यावेळी मुक्तारच्या साथीदाराने मुलीला जबरदस्तीने पकडून ठेवले व मुक्तारने चाकूने मुलीच्या ओठांवर वार करत ओठ कापले. जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी सुरुवातीला शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी तिला कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र ओठांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने डॉक्टरांनी तिला केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सध्या तिच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुक्तार व शाहीद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा'
'मुक्तारचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा, अशी धमकीही त्याने दिली होती. प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने अनेकदा धमक्याही दिल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी